Double Hat Trick : W,W,W, W, W, W अरे हॅट्रिक सोडा डबल हॅट्रिक घेतलीय, कोण आहे तो खेळाडू?

| Updated on: Jun 16, 2023 | 8:29 PM

Oliver Whitehouse : चांगल्या-चांगल्या बॉलरच्या नावावर खराब रेकॉर्डचा डाग लागतो. मात्र एका गोलंदाजाने आपल्या एकाच ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. या 6 विकेट्स घेताना पठ्ठ्याने दोनवेळा हॅट्रिक केली.

Double Hat Trick : W,W,W, W, W, W अरे हॅट्रिक सोडा डबल हॅट्रिक घेतलीय, कोण आहे तो खेळाडू?
Follow us on

मुंबई : क्रिकेटमध्ये प्रत्येकाला षटकार-चौकार पाहायला आवडतो. बॉलिंगमध्य काहीवेळाच हॅट्रिक पाहायला मिळते. टी-20 क्रिकेट फॉरमॅटमधील लीगमुळे तर फलंदाजांनी अतरंगी शॉट्स आणले आहेत. त्यामुळे बॉलरची फक्त धुलाई झालेली आपण पाहिल असेल. चांगल्या-चांगल्या बॉलरच्या नावावर खराब रेकॉर्डचा डाग लागतो. मात्र एका गोलंदाजाने आपल्या एकाच ओव्हरमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. या 6 विकेट्स घेताना पठ्ठ्याने दोनवेळा हॅट्रिक केली.

इंग्लंडमधील ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या ऑलिव्हर व्हाईटहाऊस या 12 वर्षाच्या खेळाडूने ही कामगिरी आपल्या नावारवर केली आहे. सलग 6 विकेट्स घेणं काही सोपी गोष्ट नाही. कारण हॅट्रिकच घेणं कोणत्याही गोलंदाजासाठी अवघड असतं. पहिली विकेट गेल्यावर दुसरा येणार फलंदाज आऊट होतो मात्र तिसरा येणारा हा सावध असतो. त्याला विकेट न जावू देता हॅट्रिक होऊ नसती द्यायची. त्यामुळे कित्येकवेळा सलग 2 विकेट्स घेऊन गोलंदाजांना समाधान मानावं लागतं.

 

क्लबने त्याच्या दुहेरी हॅटट्रिकसह ऑलिव्हरचा फोटो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आणि त्यानंतर काही तासांतच ऑलिव्हर हिरो बनला. ट्विटरवर त्याचे नाव चर्चेचा विषय बनले. क्लबने त्याच्याबद्दल केलेल्या पोस्टला काही तासांत 45,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

 

डावखुरा फिरकीपटू ऑलिव्हरने या सामन्यात एकूण दोन षटके टाकली आणि एकही धाव न देता एकूण आठ बळी घेतले. ऑलिव्हरने दाखवलेल्या खेळामागे त्याची मेहनत, फोकस आहे. ही त्याच्या सर्वोत्तम क्रिकेट कारकिर्दीचीही सुरुवात असू शकते. ऑलिव्हरची आजी एक उत्कृष्ट टेनिसपटू आहे. ऑलिव्हरच्या आजीने 1969 मध्ये विम्बल्डन जिंकले, जे टेनिसच्या चार ग्रँडस्लॅमपैकी एक आहे. तिचे नाव अॅन जोन्स आहे.