मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अखेरचा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसेल. भारतीय संघामध्ये सीनिअर खेळाडूंना आराम देऊनही युवा खेळाडूंनीही दमदार प्रदर्शन करत दोन्ही सामने खिशात घातले. ऑस्ट्रेलियासारख्या चॅम्पियन संघाला वर्ल्ड कप आधी दोन्ही सामन्यामध्ये केल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. वर्ल्ड कपआधी कांगारूंना अशा प्रकारे पराभूत केल्याने भारतीय खेळाडू विनिंग मूडमध्ये आहेत. मात्र अशातच भारतीय संघासाठी एका वाईट बातमी समोर आली आहे.
उद्या म्हणजेच 27 सप्टेंबरला राजकोट येथे तिसरा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचे अनेक खेळाडू माघारी संघात परतले आहेत. त्यामुळे युवा खेळाडूंना आता बाहेर बसावं लागणार आहे. यादरम्यान संघाचा स्टार खेळाडू दुखापतीमधून सावरला नाही याचा फटका तिसऱ्या सामन्यातही तो खेळाडू खेळणार नाही. हा खेळाडू आता वन डे मालिकेबाहेर झालाय. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. अद्याप तो काही दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे बुधवारच्या सामन्यामध्ये तो खेळताना दिसणार नाही.
दरम्यान, अवघ्या काही दिवसांवर वर्ल्ड कप आला आहे. आता वर्ल्ड कप फायनल संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर असून उद्याच्या सामन्यावर बरंच काहीस गणित अवलंबून असणार आहे. आर. अश्विन याला संघाता जागा द्यायची की नाही याबाबतही चर्चा सुरू आहे.
रोहित शर्मा(C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (VC), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव