कोलंबो | पाकिस्तान ए क्रिकेट टीम एमर्जिंग आशिया चॅम्पियन ठरली आहे. पाकिस्तान ए ने टीम इंडिया एवर महाअंतिम सामन्यात 128 धावांनी विजय मिळवत आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 353 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाचा डाव 40 ओव्हरमध्ये 224 धावांवर आटोपला. त्यामुळे टीम इंडियाला उपविजेतापदावर समाधान मानवं लागलं आहे. पाकिस्तानने या विजयासह 10 वर्षांपू्र्वीचा बदला घेतलाच. टीम इंडिया एने 2013 मध्ये सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान ए टीमवर विजय मिळवला होता.
पाकिस्तान ए चॅम्पियन
? ????????? ?
Pakistan Shaheens defend their #ACCMensEmergingTeamsAsiaCup title ??#BackTheBoysInGreen pic.twitter.com/ReP9mJnEra
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 23, 2023
टीम इंडियाची 353 धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात राहिली. साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. सुदर्शनने 29 धावांची खेळी केली. त्यानंतर निकीन जोस याच्या रुपात टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली. निकीनने 11 धावांचं योगदान दिलं. मोहम्मद वसीम ज्यूनिअर याने निकीन याला एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाची 2 बाद 80 अशी स्थिती झाली.
त्यानंतर अभिषेक शर्मा आणि कॅप्टन यश धूल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. अभिषेकने 51 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्स ठोकत 61 रन्स केल्या. त्यानंतर निशांत सिंधू, यश धुल आणि ध्रुव जुरेल दोघेही ठराविक अंतराने बाद झाले. सिंधूने 10, धुलने 39 आणि ध्रुव याने 9 धावा जोडल्या.
टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे विजयाची आशा कमी झाली होती. आघाडीचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर उर्वरित फलंदाजांनीही आपल्या विकेट टाकल्या आणि पाकिस्तान आशिया चॅम्पियन ठरली. पाकिस्तानकडून सूफियान मुकीम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मेहरान मुमताज, अर्शद इक्बाल आणि मोहम्मद वसीम ज्यूनिअर या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुबासिर खान याच्या खात्यात एकमेव विकेट गेली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने शानदार सुरुवात केली. सॅम अयूब आणि साहिबजादा फरहान या दोघांनी 121 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला झटके देत जोरदार कमबॅक केलं. टीम इंडियाने झटके देत पाकिस्तानची 5 बाद 187 अशी स्थिती केली.
त्यानंतर तय्यब ताहीर आणि आणि मुबासिर खान या दोघांनी 126 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे पाकिस्तानने 300 पार मजल मारली. शेवटी काही जणांनी जोरदार फटकेबाजी केली आणि पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 352 धावा केल्या. पाकिस्तानकडून तय्यब याने शतक ठोकलं. तय्यबने 71 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरच्या मदतीने 108 रन्स केल्या. तर साहिबजादा याने 59 रन्स केल्या. टीम इंडियाकडून राजवर्धन हंगरगेकर आणि रियान पराग या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर हर्षित राणा, मानव सुथार आणि निशांत सिंधू या तिघांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, आरएस हंगरगेकर आणि युवराजसिंह डोडिया.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि अर्शद इक्बाल, सुफियान मुकीम.