कोलंबो | एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेतील 12 व्या सामन्यात बी ग्रूपमधील पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून सैम अयुब आणि साहिबझादा फरहान सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी 9 धावा केल्या. त्यानंतर मराठमोळ्या ‘तुळजापूर एक्सप्रेस’ राजवर्धन हंगरगेकर याने पाकिस्तानला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं.
राजवर्धन याने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सॅम अयुब याला कॅप्टन ध्रुव जुरेल याच्या हाती कॅचआऊट केलं. सॅमला भोपळाही फोडता आला नाही. तर त्यानंतर ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर राजवर्धन याने ओमर यूसुफला पुन्हा यशच्या हाती कॅच आऊट केलं. विशेष म्हणजे राजवर्धन याने सॅम आणि ओमर या दोघांना झिरोवरच आऊट केलं. राजवर्धनने 2 झटके दिल्याने पाकिस्तानची 9-0 वरुन 9-2 अशी स्थिती झाली. विशेष म्हणजे राजवर्धन याने टाकलेली ही ओव्हर डबल विकेट मेडन ठरली.
राजवर्धन हंगरगेकर याचा पाकिस्तानला झटका
Pace is Pace Yaar, right? ?
Hangargekar with two wickets early in the game!#INDvPAK #LIVEonFanCode pic.twitter.com/WCqF7vO4bS
— FanCode (@FanCode) July 19, 2023
राजवर्धनने दिलेल्या चांगल्या सुरुवातीचा टीम इंडियाच्या इतर गोलंदाजांनी त्याचा फायदा घेत पाकिस्तानला झटके दिले. राजवर्धननंतर मानव सुथार याने 3 विकेट्स घेतल्या. तर रियान पराग याने एका फलंदाजाला माघारी पाठवलं. त्यामुळे पाकिस्तानची 27 ओव्हरमध्ये 6 बाद 95 अशी स्थिती झाली आहे.
दरम्यान पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा असा आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत या स्पर्धेत पहिले 2 सामने जिंकले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांनी नेपाळ आणि यूएई या संघांना पराभूत केलं. आता त्यानंतर दोन्ही संघ आता आमनेसामने आहेत. दोन्ही संघांना विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे. यामुळे आता दोघांपैकी कोणती टीम वरचढ ठरुन विजयी होते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
पाकिस्तान ए प्लेईंग इलेव्हन | मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सॅम अयुब, हसीबुल्ला खान, कामरान गुलाम, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, मुबासिर खान, मेहरान मुमताज, मोहम्मद वसीम जूनियर आणि शाहनवाज दहनी.
टीम इंडिया ए प्लेईंग इलेव्हन | यश धुल (कर्णधार), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, रियान पराग, निशांत सिंधू, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.