भर सामन्यात शाहीन आफ्रिदीने बाबरला ‘झिम्बू’ म्हणून हिणवलं! ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Oct 11, 2024 | 1:49 PM

इंग्लंडविरुद्धही पाकिस्तानची पराभवाची मालिका सुरु आहे. पाटा खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकूनही मनासारखं करता आलं नाही. उलट इंग्लंडने पाकिस्तानला कोंडीत पकडलं असंच म्हणावं लागेल. इंग्लंडने पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी नमवलं. या पराभवा व्यतिरिक्त बाबर आझमचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे. असं असता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भर सामन्यात शाहीन आफ्रिदीने बाबरला झिम्बू म्हणून हिणवलं! तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: PTI/X
Follow us on

पाकिस्तानचे क्रिकेट संघाचे फॅन्स आणि त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायम चर्चेचे विषय ठरतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता एका पाकिस्तानी क्रिकेट फॅनने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी बाबर आझमला झिम्बू म्हणून हाक मारत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुल्तान कसोटीतील हा व्हिडीओ असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. हे नाव साधं वाटत असलं तरी सोशल मीडियावरून बाबर आझमला झिम्बू, झिम्बाबर, झिमपाल या नावांनी हिणवलं जातं. कारण बाबर आझमची बॅट कायम दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्ध तळपते असा त्यांचा आरोप आहे. असं असताना शाहीन आफ्रिदीच्या तोंडून असे शब्द निघणे सहाजिकच चर्चेचा विषय ठरणार आहे. कारण या दोघांमध्ये जराही पटत नसल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. शाहीनचा सासरा शाहीद आफ्रिदीनेही वारंवार बाबरवर टीका केली आहे. त्यामुळे या व्हिडीओचं महत्त्व वाढलं आहे.

सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या व्हिडीओला तसा काही आवाज नाही. पण लिपसिंकच्या आधारे पाकिस्तानी चाहत्यांनी हा अंदाज बांधला आहे. पाकिस्तानी चाहत्यांनी दावा केला आहे की, शाहीन आफ्रिदीने एकदा दोनदा नाही कित्येक वेळा झिम्बू या शब्दाचा वापर केला आहे. पण या व्हिडीओचा स्पष्ट असा आवाज नसल्याने खरं काय ते सांगता येत नाही. पण पाकिस्तानी चाहत्यांना असं वाटत असून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बाबर आझम मुल्तानच्या पाटा विकेटवरही फलंदाजी करू शकला नाही, याचं आश्चर्य क्रीडातज्ज्ञांना वाटत आहे. काही क्रीडातज्ज्ञांनी बाबर आझमला आराम देण्याची मागणी देखील केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तर बाबर आझमचा फॉर्म कायमचा गेल्याचं दिसत आहे. मागच्या 18 डावात बाबर आझमने 50 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरला आहे. मुल्तानच्या खेळपट्टीवर एकीकडे धावांचा डोंगर उभा राहात होता. तिथे बाबर आझमने पहिल्या डावात 71 चेंडूत 30 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात फक्त 5 धावा करून बाद झाला.