मुंबई | आशिया कप 2023 स्पर्धेआधी टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टेस्ट, एकदिवसीय मालिकेनंतर टी 20 सीरिज खेळत आहे. तर यानंतर आयर्लंड दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात आशिया कपआधी वनडे सीरिज होणार आहे. अफगाणिस्तानने वनडे सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
अफगाणिस्तानने 18 सदस्यीय संघ जाहीर केलाय. या 18 पैकी मुख्य संघात 16 खेळाडूंचा समावेश आहे. तर उर्वरित 2 खेळाडूंना राखीव म्हणून संधी दिली आहे. हशमतुल्लाह शाहिदी हा पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तानचं कर्णधारपद सांभळणार आहे. तर नूर अहमद याचं टीममध्ये कमबॅक झालंय.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 3 एकदिवसीय मालिका होणार आहे. ही मालिका श्रीलंकेत पार पडणार आहे. मालिकेला 22 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 26 ऑगस्टला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे.
पाक विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी अफगाणिस्तान टीम
? SQUAD ALERT ?
Here’s Afghanistan Squad for the three-match ODI series against @TheRealPCB, scheduled for August 22 to 26 in Sri Lanka. ?
More ?: https://t.co/xyMDNLhxnV #AfghanAtalan | #AFGvPAK | #ByaLobaGato | #SuperCola pic.twitter.com/BUKktPp0WN
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 6, 2023
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, पहिला सामना, 22 ऑगस्ट, हंबनटोटा.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुसरा सामना, 24 ऑगस्ट, हंबनटोटा.
पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुसरा सामना, 26 ऑगस्ट, कोलंबो.
पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, इब्राहिम जद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, अब्दुल रहमान, मोहम्मद सलीम सफी आणि वफादर मोमंद.
राखीव खेळाडू | फरीद अहमद आणि शाहिदुल्लाह कमाल.
दरम्यान आशिया कप आणि वर्ल्ड कपनंतर नववर्षात 2024 मध्ये टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच द्विपक्षीय एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या होम सिजनचं वेळापत्रक जाहीर केलं होतं.
त्यानुसार अफगाणिस्तान या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 3 मॅचची ही वनडे सीरिज असणार आहे. 11 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान ही मालिका होणार आहे.