PAK vs BAN: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा

| Updated on: Aug 25, 2024 | 4:09 PM

Pakistan vs Bangaladesh 1st Test Match Highlights : बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बांगलादेशने पाकिस्तानवर पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

PAK vs BAN: बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा
bangladesh cricket team
Image Credit source: bangladesh cricket x account
Follow us on

बांगलादेश क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. बांगलादेशने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 30 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशची सलामी जोडी झाकीर हसन (15) आणि शादमन इस्लामने (9) हे आव्हान 6.3 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बांगलादेशने या विजयासह 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. तसेच हा बांगलादेशचा कसोटी इतिहासातील पाकिस्तान विरुद्धचा हा पहिलावहिला विजय ठरला आहे. पाकिस्तानला त्यांचा पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय महागात पडला.

सामन्याबाबत सविस्तर

पाकिस्तानने पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान आणि सउद शकील या दोघांनी शतकी खेळी केली. रिझवानने 239 बॉलमध्ये 171 धावा केल्या. तर शकीलने 141 धावांचं योगदान दिलं. तर सॅम अयुब याने 56 धावा जोडल्या. बाबर आझमला भोपळाही फोडता आला नाही.

बांगलादेशकडून चोख प्रत्युत्तर

आपण बांगलादेश आधी रोखू, असा विश्वास पाकिस्तानला होता. मात्र तोच पाकिस्तानला महागात पडला. बांगलादेशने पाकिस्तानचा चोख प्रत्युत्तर दिलं. बांगलादेशने पहिल्या डावात ऑल आऊट 565 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला 117 धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशकडून अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 191 धावा केल्या. सदमन इस्लामने 93, मेहदी हसन मिराजने 77, लिटॉन दास 56 आणि मोमिनुल हक याने 50 धावांचं योगदान दिलं.

त्यानंतर पाकिस्तानला 117 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात 146 धावाच करता आल्या. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 30 धावांचं माफक आव्हान मिळालं. बांगलादेशने हे आव्हान सहज पूर्ण केलं.

बांगलादेशचा 10 विकेट्सने दणदणीत विजय

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.