पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात बुधवार 21 ऑगस्टपासून कसोटी मालिका होणार आहे. टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीवर असल्याने क्रिकेट चाहत्यांना या मालिकेचे वेध लागले आहेत. या मालिकेत शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर नजमूल हुसैन शांतो बांगलादेशचं कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. पहिल्या सामन्याला आता अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.पीसीबीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात विंडिजवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने यासह ही मालिका 1-0 ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी झेप घेतली. त्यामुळे पाकिस्तानला झटका लागला. पाकिस्तानची सहाव्या स्थानी घसरण झाली. मात्र पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका जिंकून रँकिगमध्ये चांगल्या स्थितीत पोहचण्याची संधी आहे.
दरम्यान पाकिस्तान बांगलादेश विरुद्ध कसोटीमध्ये आतापर्यंत अजिंक्य आहे. बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध इतक्या वर्षात एकदाही कसोटी सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे यंदा बांगलादेशचा पाकिस्तान विरुद्ध विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.
पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी
दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रावळपिंडी
पाकिस्तानची प्लेइंग ईलेव्हन जाहीर
🚨 Pakistan’s playing XI for the first Test 🚨#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/2Q94RZStPB
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 19, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम , हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.