PAK vs BAN: बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची दुर्दशा, शेजाऱ्यांना झटका

| Updated on: Aug 25, 2024 | 7:40 PM

Pakistan vs Bangladesh: बांगलादेशने रावळपिंडीत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने पराभूत केलं. पाकिस्तानला या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे.

PAK vs BAN: बांगलादेश विरूद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानची दुर्दशा, शेजाऱ्यांना झटका
pakistan cricket team
Image Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us on

बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तानवर पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशचा पाकिस्तान विरुद्धचा हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला. बांगलादेशला पाकिस्तान विरूद्धच्या 13 कसोटी सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर पहिला विजय मिळवण्यात यश आलं. तसेच बांगलादेशचा हा परदेशातील एकूण सातवा विजय ठरला. बांगलादेशने याआधी 2022 साली न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत केलं होतं. त्यानंतर आता 2 वर्षांनी बांगलादेशने परदेशात पहिलावहिला विजय मिळवला आहे.

तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला या पराभवासह गेल्या 17 तासात दुसरा मोठा झटका लागला आहे. पाकिस्तानला या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 या साखळीत मोठा फटका बसला आहे. पाकिस्तानची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरण झाली आहे. पाकिस्तानची थेट आठव्या स्थानी घसरण झाली आहे. पाकिस्तान या सामन्याआधी सातव्या स्थानी होती. पाकिस्तानच्या खात्यात आता 22 गुण आहेत. तर विंडिज सर्वात शेवटी नवव्या स्थानी आहे. तर बांगलादेशला विजयामुळे फायदा झाला आहे. बांगलादेश विजयासह संयुक्तरित्या पाचव्या स्थानी पोहचली आहे. बांगलादेशच्या खात्यात 24 गुण आहेत.

तर दुसऱ्या बाजूला 24 ऑगस्ट रोजी इंग्लंडने श्रीलंकेवर पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी 5 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानला या सामन्याचाही फटका बसला. पाकिस्तानची या निकालामुळे सहाव्यावरुन सातव्या स्थानी घसरण झाली. तर आता बांगलादेशने घरच्या मैदानात पराभूत करत पाकिस्तानला आठव्या स्थानी ढकललं. पाकिस्तानला अशाप्रकारे काही तासांमध्ये दुहेरी झटका लागला.

हे सुद्धा वाचा

दरम्यान पाकिस्तानला 2021 नंतर आपल्या घरात एकही सामना जिंकता आलेला नाही. पाकिस्तानने आपल्या घरात अखेरचा सामना हा 2021 साली रावळपिंडीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध जिंकला होता. तेव्हापासून पाकिस्तानला पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. पाकिस्तानला या दरम्यान 5 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय. तर 4 सामने बरोबरीत सोडवण्यात यशं आलं.

टीम इंडिया अव्वल स्थानी

दरम्यान टीम इंडिया या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी कायम आहे. टीम इंडियाने या साखळीत खेळलेल्या एकूण 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.