पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात शुक्रवार 30 ऑगस्टपासून कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 10 वाजता टॉस होईल. शान मसूद याच्याकडे पाकिस्तानचं नेतृत्व आहे. तर नजमुल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशची धुरा आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने ते 1-0 ने आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानसाठी हा करो या मरो असा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान विजयासाठी पूर्ण तयारीने मैदानात उतरणार आहे.
उभयसंघात दुसराही सामना रावळपिंडी येथेच खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश या मालिकेत आघाडीवर असल्याने त्यांना मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत केलं. बांगलादेशचा पाकिस्तान विरुद्धचा हा पहिलावहिला कसोटी विजय ठरला. त्यानंतर आता बांगलादेशकडे पहिला कसोटी मालिका विजय मिळवण्याची संधी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या तुलनेत बांगलादेशवर फारसा दबाव नसेल. सामना बरोबरीत सुटला तरी बांगलादेशच्या नावावर मालिका होईल. मात्र पाकिस्तानला मालिका गमवायची नसेल, तर त्यांच्यासमोर विजयाशिवाय कोणाच पर्याय नाही. त्यामुळे पाकिस्तान दबावात असेल, हे निश्चित. त्यामुळे पाकिस्तान या दबावात मुसंडी मारते की फ्लॉप ठरते, हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
बांगलादेश मालिका विजयासाठी सज्ज
Bangladesh Tour of Pakistan 2024
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
August 30 – September 03, 2024 | Rawalpindi | 11:00 AM (BST)Live on T Sports and Gazi TV#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/XbRNENkJRf
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 29, 2024
दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तानची टीम : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयूब, बाबर आझम, सऊद शकील, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, अबरार अहमद, नसीम शाह आणि मीर हमजा.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद, नाहिद राणा, खालेद अहमद, नईम हसन, तस्किन अहमद आणि तैजुल इस्लाम.