पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. बांगलादेशच्या लिटन दास याने सामन्यातील तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात शतक झळकावलं आहे. लिटनने टीम अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक करत डाव सावरण्यात निर्णायक भूमिका बजावली. लिटनने 171 बॉलमध्ये चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. लिटनने 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक केलं. लिटनच्या कसोटी कारकीर्दीतील हे चौथं शतक ठरलं. तसेच लिटन पाकिस्तान विरुद्ध 3 वर्षांनी शतक करण्यात यशस्वी ठरला. लिटनच्या या शतकी खेळीमुळे बांगलादेशला 200 पार मजल मारता आली.
पाकिस्तानने पहिल्या डावात 274 धावा केल्या. बांगलादेशची 274 धावांच्या प्रत्युत्तरात नाजूक स्थिती झाली. बांगलादेशने 26 धावांवरच 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे बांगलादेश 50 धावा करेल की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र लिटन दास आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी टीमसाठी संकटमोचकाची भूमिका बजावली. दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे बांगलादेशने कमबॅक केलं. या जोडीने सातव्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. मेहदीने 124 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 78 रन्स केल्या.
दरम्यान लिटन दासने मेहदी हसन मिराजसह 30 धावांच्या आत सहा विकेट गेल्यानंतर सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम केला. लिटन बांगलादेशचा 6 बाद 26 अशी स्थिती असताना सातव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. त्यानंतर मेहदी आणि लिटन या दोघांनी 165 धावांची भागीदारी केली.
लिटन दासची शतकी खेळी
Scintillating 100! 💥
Litton Das slams his 4th Test hundred at Rawalpindi against Pakistan. 💯👏PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/GZvsW2WFNw
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 1, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.