देशात तणावाची स्थिती आणि अराजकता असताना बांगलादेश क्रिकेट टीम पाकिस्तानमध्ये पोहचली आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. बांगलादेश या कसोटी मालिकेसाठी काही तांसापूर्वी पाकिस्तानात दाखल झाली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी रविवारी 11 ऑगस्ट रोजी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. नजमुल हुसैन शांतो हा या मालिकेत बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर शाकिब अल हसन याचं पुनरागमन झालं आहे. तसेच 2 खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.
शाकिब अल हसन याने बांगलादेशसाठी अखेरचा कसोटी सामना हा मे महिन्यात खेळला होता.तेव्हा श्रीलंकेने बांगलादेशचा दौरा केला होता. ही एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका होती. शाकिब त्या मालिकेनंतर सातत्याने टी 20 वर्ल्ड कप आणि इतर टी 20 क्रिकेट लीग स्पर्धेत खेळत आहे. शाकिबसह टीममध्ये अनुभवी विकेटकीपर फलंदाज मुशफिकुर रहीम आणि वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याचं कमबॅक झालं आहे. तस्कीन या मालिकेतील दुसराच सामना खेळणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 6 कसोटी मालिका खेळवण्यात आल्या आहेत. मात्र बांगलादेशला एकही मालिका जिंकता आलेली नाही. आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 6 मालिकांमध्ये 13 सामने खेळले आहेत. बांगलादेशला या 13 मधून फक्त 1 सामना अनिर्णित सोडवण्यात यश आलं आहे. तर इतर 12 सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला आहे.
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.