बांगलादेशला गेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकदाही विजय मिळवता आला नव्हता. मात्र बांगलादेशने यंदाच्या पाकिस्तान दौऱ्यात इतिहास रचला. बांगलादेशने फक्त विजयच मिळवला नाही, तर पाकिस्तानचा दोन्ही सामन्यात सुपडा साफ केला. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. तर दुसर्या सामन्यात 6 विकेट्सने मात करत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला. बांगलादेशचा पाकिस्तानमधील हा पहिलावहिला, ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा हा मालिका विजय ठरला. बांगलादेशसाठी हा मालिका विजय भारत दौऱ्याच्या हिशोबाने फायदेशीर ठरला आहे. बांगलादेशन पाकिस्ताननंतर आता भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र बांगलादेशने पाकिस्तामध्ये नक्की काय काय विक्रम केलेत? हे जाणून घेऊयात.
बांगलादेशने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत 10 विकेट्सने लोळवलं. बांगलादेश यासह पाकिस्तानला त्यांच्यात घरात 10 विकेट्सने पराभूत करणारी पहिलीच टीम ठरली. तसेच दुसऱ्या सामन्यात मात करत बांगलादेशचा पाकिस्तानमधील हा पहिला मालिका विजय ठरला.
बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात फलंदाजांसह गोलंदाजांचंही योगदान राहिलं. बांगलादेशी गोलंदाजांनी या मालिकेत ते करुन दाखवलं, जे याआधी करता आलं नव्हतं. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्यांदाच डावातील 10 च्या 10 विकेट्स घेतल्या.बांगलादेशच्या गोलंदाजांनी ही कामगिरी दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात केली.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमूद याने कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. महमूदने दुसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात या 5 विकेट्स घेतल्या. महमूदने 10.4 ओव्हरमध्ये 43 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स घेतल्या.
पाचवा आणि शेवटचा कारनामा म्हणजे बांगलादेशचे आघाडीचे गोलंदाज हे पाकिस्तानच्या बॉलर्सपेक्षा प्रभावी ठरले. बांगलादेशच्या पेसर्सनी दुसऱ्या सामन्यातील 20 पैकी 14 विके्टस घेतल्या. तर पाकिस्तानला फक्त 10 विकेटच घेता आल्या.
बागंलादेशसाठी ऐतिहासिक मालिका विजय
Bangladesh team celebrates with the trophy after securing their first-ever Test series win against Pakistan.🏆🎉
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC2 pic.twitter.com/qJtfXccjrs
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 3, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.
बांगलदेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.