लाहोर | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 राऊडंला आज 6 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश विरुद्ध आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे पाकिस्तानमधील लाहोर येथील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बागंलादेशने या महत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. बांगलादेश कॅप्टन शाकिब अल हसन याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मोठे बदल केले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे.
पाकिस्तानने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यासाठी 5 सप्टेंबर रोजीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली होती. त्यानुसार पाकिस्तान टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोहम्मद नवाझ याच्या जागी फहीम अश्रफ या बॉलिंग ऑलराउंडरला संधी दिली आहे. तर बांगलादेशच्या लिटॉन दास याची एन्ट्री झाली आहे. नजमुल हुसैन शांतो हा दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. तर लिटॉन दास याची प्रकृती सुधारल्याने त्याला नजमूलच्या जागी स्थान देण्यात आलंय.
बांगलादेश टॉसचा बॉस
The news from the center is that Bangladesh have won the toss, and chose to bat first on a belter of a Lahore track. We’re expecting to see loads of runs and plenty of action from both sides 🔥🔥#AsiaCup2023 #PAKvsBAN pic.twitter.com/FcufwPnw4x
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 6, 2023
पाकिस्तान-बांगलादेश दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत एकूण 37 वेळा भिडले आहेत. या 37 सामन्यांमध्ये पाकिस्तान वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने 32 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला केवळ 5 वेळाच जिंकता आलंय. तसेच हे दोन्ही संघ वनडे आशिया कपमध्ये 13 सामने खळले आहेत. पाकिस्तानने 13 पैकी 12 वेळा बांगलादेशला पराभवाची धुळ चारली आहे. तर बांगलादेशला केवळ एकदाच विजय मिळवता आलाय. तसेच पाक-बांगला यांच्यातील गेल्या 10 सामन्यांमध्ये बांगलादेशने 4 आणि पाकिस्तानने 6 सामने जिंकले आहेत.
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये 2022 पासून आतापर्यंत पहिले बॅटिंग करणारे 3 वेळा जिंकले आहेत. तर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना 2 वेळा विजय मिळवता आला आहे.
दरम्यान सामन्याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश टीम राष्ट्रगीतासाठी मैदानात आली. राष्ट्रगीताआधी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी, सपोर्ट स्टाफ आणि उपस्थित सर्वांनीच हीथ स्ट्रीक यांना श्रद्धांजली वाहिली. हीथ स्ट्रीक हे झिंबाब्वेचे माजी कर्णधार होते. त्यांनी 3 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, लिटॉन दास, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद.