पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा रावळपिंडी येथे खेळवण्यात येणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 10 वाजता टॉस होणार आहे. शान मूसद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर नजमूल हुसैन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघातील कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी जाणून घेऊयात. तसेच पहिला सामना कुठे पाहता येणार? याची माहिती घेऊयात.
पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. बांगलादेशला अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता बांगलादेशचा पाकिस्तानला पराभूत करत कसोटी क्रिकेटमधील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.
बांगलादेशची कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक कामगिरी राहिली आहे. बांगलादेशला पाकिस्तान विरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही. उभयसंघातील ही सातवी टेस्ट सीरिज आहे. त्याआधीच्या एकूण 6 मालिकांमध्ये पाकिस्ताननेच विजय मिळवला आहे. दोन्ही संघात एकूण 6 मालिकांमध्ये 13 सामने झाले आहेत. बांगलादेशला या 13 मधून फक्त 1 सामना अनिर्णित सोडवता आला आहे. तर उर्वरित 12 सामन्ंयामध्ये पाकिस्तानने विजय मिळवलाय.
पाकिस्तान-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी सज्ज
Trophy with a view 🏆💫
🇵🇰 and 🇧🇩 Test captains at Daman-e-Koh, Islamabad ©️
The Bank Alfalah Presents Blue World City Pakistan vs Bangladesh Test Series 2024 starts tomorrow 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/Pa2ZRiEDa9
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 20, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सौद शकील (उपकर्णधार) अब्दुल्लाह शफीक, सॅम अय्युब, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान अली आघा, शाहीन शाह अफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहझाद आणि मोहम्मद अली.
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटॉन कुमार दास, मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम, हसन महमूद, तस्कीन अहमद आणि सय्यद खालेद अहमद.