पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात ऑगस्ट महिन्यातील तिसऱ्या आठवड्यापासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. बांगलादेश या टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 3 सप्टेंबरला या मालिकेची सांगता होणार आहे. या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम सज्ज आहे. पीसीबी अर्थात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर बाबर आझम आणि शाहीन शाह अफ्रिदी यांचा समावेश करण्यात आला आहे. मालिकेतील सर्व सामने हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या साखळीचा भाग आहे.
सऊद शकील याला या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी शाहीन शाह अफ्रिदी उपकर्णधार होता. शाहीनकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली. तसेच गेल्या मालिकेतील एकूण खेळाडूंपैकी 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने अखेरची मालिका ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली होती. तसेच मोहम्मद हुरैरा, कामरान गुलाम आणि मोहम्मद अली या तिघांना त्यांच्या कामगिरीचं बक्षिस मिळालं आहे. या तिघांना संधी देण्यात आली आहे. तसेच नसीम शाह याचं तब्बल 13 महिन्यांनी कसोटी संघात कमबॅक झालं आहे.
टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तान टीम, बांगलादेश विरुद्ध 2 सामने
🚨 Pakistan squad for Bangladesh Tests and Shaheens side for first four-day against Bangladesh A announced 🚨
More details ➡️ https://t.co/IIKz5hxGJA
Pakistan men’s international 2024-25 season schedule 👉 https://t.co/H1nrxE5EQR#PAKvBAN pic.twitter.com/TLgyB4ajfB
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 7, 2024
पहिला सामना, 21-25 ऑगस्ट, रावळपिंडी
दुसरा सामना, 30 ऑगस्ट-3 सप्टेंबर, कराची
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम: शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.