इंग्लंडने मुल्तान क्रिकेट स्टेडियममध्ये यजमान पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी 123.2 ओव्हरमध्ये 366 धावांवर ऑलआऊट केलं आहे. पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी 5 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 107 धावाच करता आल्या. पाकिस्तानने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 259 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे पाकिस्तानकडे सहज 400 पार जाण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी कमबॅक करत पाकिस्तानला रोखण्यात यश मिळवलं.
पाकिस्तानकडून डेब्यूटंट कामरान गुलाम याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. कामरानने पदार्पणात शतक ठोकलं. कामरान पदार्पणात शतक करणारा 13 वा पाकिस्तानी फलंदाज ठरला. कामरानने 224 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 118 धावांची खेळी केली. ओपनर सॅम अयुबने 77 धावांचं योगदान दिलं. विकेटकीपर मोहम्मद रिझवान याने 41 धावा केल्या. तर तिघांनी प्रत्येकी 30+ धावा केल्या. मात्र त्यांना इंग्लंडच्या धारदार बॉलिंगसमोर या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. आमेर जमाल याने 37 धावांची खेळी केली. नोमान अली याने 32 धावा केल्या. तर आघा सलमान याने 31 धावांची भर घातली. या त्रिकुटाने दिलेल्या या योगदानामुळे पाकिस्तानला 350 पार मजल मारता आली.
पाकिस्तानच्या चौघांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचता आलं नाही. अब्दुल्ला शफीक 7,सौद शकील 4, कॅप्टन शान मसूदने 3 आणि साजीद खानने 2 धावा केल्या. तर झाहीद महमूदने नाबाद 2 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीच याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. ब्रायडन कार्स याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मॅथ्यू पॉट्सने 2 तर शोएब बशीरने 1 विकेट घेतली.
पाकिस्तानचं 366 धावांवर पॅकअप
❌ ALL OUT ❌
Pakistan end their first innings on 3️⃣6️⃣6️⃣
Who’s looking forward to watching us have a bat? 🙋♂️ pic.twitter.com/NXpuWs5w3K
— England Cricket (@englandcricket) October 16, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.