पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा मुल्तान येथे खेळवण्यात येत आहे. पाकिस्तानने इंग्लंडला तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 291 धावांवर ऑलआऊट करत 75 धावांची निर्णायक आघाडी घेतली आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात 366 धावा केल्या होत्या. इंग्लंडला या प्रत्युत्तरात 67.2 ओव्हरमध्ये 291 पर्यंतच पोहचता आलं. पाकिस्तानचा साजीद खान याने इंग्लंडला दणका दिला. साजीदने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्याने इंग्लंडला 300 च्या आत रोखण्यात यश आलं. इंग्लंडला तिसऱ्या दिवशी 4 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 52 धावाच करता आल्या. पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 बाद 239 धावा केल्या होत्या. आता पाकिस्तान या निर्णायक आघाडीसह इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. डकेटने 129 बॉलमध्ये 16 फोरसह 114 रन्स केल्या. डकेटचं हे कसोटी कारकीर्दीतील चौथं तर पाकिस्तान विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. मात्र त्या व्यतिरिक्त एकालाही 35 पार मजल मारता आली नाही. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने 34 धावांचं योगदान दिलं. तर ओली पोप याने 29, ओपनर झॅक क्रॉली याने 27, जॅक लीच याने नाबाद 25 धावांचं योगदान दिलं. तर जॅमी स्मिथने 21 धावांची भर घातली. तर 5 जणांना दुहेरी आकाडाही गाठता आला नाही. हॅरी ब्रूक आणि शोएब बशीर या दोघांनी प्रत्येकी 9-9 धावा केल्या. मॅथ्यू पॉट्सने 6 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ब्रायडन कार्स याने 4 तर कॅप्टन बेन स्टोक्सने 1 धाव केली.
तर पाकिस्तानचे दोनच गोलंदाज इंग्लंडला पुरून उरले. पाकिस्तानकडून साजीद खान आणि नोमान अली या दोघांनी इंग्लंडचं पॅकअप केलं. साजीद खान याने 26.2 ओव्हरमध्ये 111 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या. तर नोमान अलीने 28 षटकांमध्ये 101 धावा देत तिघांना बाद केलं.
पाकिस्तानकडे 75 धावांची आघाडी
All 1️⃣0️⃣ wickets taken by the Sajid-Noman duo 🔥
Superb spells by the two spinners sees Pakistan take a first-innings lead of 7️⃣5️⃣ runs 🏏#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/rD9Ql6qJF0
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 17, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.