पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरी आणि फायनल मॅच 24 ऑक्टोबरपासून रावळपिंडी येथे खेळवण्यात येमार आहे. पाकिस्ताने पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटीतून जोरदार कमबॅक केलं आणि इंग्लंडला 152 धावांनी पराभूत केलं. आता पाकिस्तानकडे तिसऱ्या सामन्यात विजयी होत मायदेशात मालिका जिंकण्याची संधी आहे. पाकिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या तिसऱ्या साखळीतील गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे पॉइंट्स टेबलमधील स्थिती सुधारण्याची संधी आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर बाबर आझम, नसीम शाह,अब्ररार अहमद आणि शाहीन शाह अफ्रिदी या चौघांची हकालपट्टी केली. त्यानंतर पाकिस्तानने दुसरा सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर पाकिस्तानने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर इंग्लंडने पराभवानंतर अंतिम 11 खेळाडूंमधून दोघांना डच्चू दिलाय. ब्रायडन कार्से याच्या जागी रेहान अहमद याचा समावेश करण्यात आला आहे. रावळपिंडीची खेळपट्टी स्पिनसाठी पूरक असल्याने रेहानला संधी दिली आहे.
तसेच मॅथ्यू पॉट्स याच्या जागी गस एटकीन्स याला संधी दिली गेली आहे. गसने पहिल्या कसोटीत 4 विकेट्स घेत इंग्लंडला डावाने विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. मात्र त्याला दुसरअया सामन्यात सहभागी होता आलं नाही. पाकिस्तानसमोर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचं तगडं आव्हान असणार आहे. इंग्लंड पाकिस्तानला सहजासहजी जिंकून देणार नाही. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
पाकिस्तान-इंग्लंड तिसरा कसोटी सामना रावळपिंडी येथे 24 ऑक्टोबरपासून खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान-इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.
पाकिस्तान-इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. मात्र मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहता येईल.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुला शफीक, कामरान गुलाम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, सलमान अली आगा, आमेर जमाल, नोमाल अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.
अंतिम कसोटी सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॅमी स्मिथ (विकेटकीपर), गस एटकिन्सन, रेहान अहमद, जॅक लीच आणि शोएब बशीर.