PAK vs IND Reserve Day | पाक-टीम इंडिया मॅच राखीव दिवशी, तिकीटासाठी पुन्हा पैसे मोजावे लागणार?

| Updated on: Sep 10, 2023 | 10:46 PM

Asia Cup 2023 Pakistan vs India Reserve Day Tickets | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सुपर 4 मधील सामन्यातील मुख्य दिवस पावसामुळे वाया गेल्या. त्यामुळे आता उर्वरित पुढील खेळ राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे.

PAK vs IND Reserve Day | पाक-टीम इंडिया मॅच राखीव दिवशी, तिकीटासाठी पुन्हा पैसे मोजावे लागणार?
Follow us on

कोलंबो |  पाकिस्तान-टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 सुपर 4 मधील मुख्य दिवसाचा खेळ (10 सप्टेंबर) पावसामुळे वाया गेला. पावसामुळे हा मुख्य दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुदैवाने सामन्याचा निकाल लावण्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी होणार आहे. या सामन्यासाठी 11 सप्टेंबर हा राखीव दिवस आहे. आता दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी राखीव दिवशी आमनेसामने भिडणार आहेत. राखीव दिवसातील सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी एसीसी अर्थात आशियाई क्रिेकट काउन्सिलने सामन्याच्या तिकीटाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

पुन्हा तिकीट काढावं लागणार?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्यातील मुख्य दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे हा सामना आता राखीव दिवशी होईल. आता या राखीव दिवशी मॅच पाहण्यासाठी मुख्य दिवसाचं तिकीट वैध असतील की नव्याने तिकीट घ्यावं लागणार,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. क्रिकेट चाहत्यांच्या या प्रश्नाचं उत्तर एसीसीने ट्विट करत दिलं आहे. एसीसीचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

हे सुद्धा वाचा

एसीसीने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

ही तिकीटं 11 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाक सामन्यासाठी वैध असतील. त्यामुळे भारत पाकिस्तान सुपर 4 मधील मुख्य सामन्याची तिकीट जपून ठेवावीत, एसीसीने असं आवाहन ट्विटद्वारे क्रिकेट चाहत्यांना केलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना राखीव दिवसाच्या उर्वरित खेळासाठी अधिकचे पैसे मोजून तिकीट खरेदी करण्याची गरज नसणार आहे. तसेच आशिया कप 2023 मधील अंतिम सामना हा 17 सप्टेंबरला होणार आहे. या अंतिम सामन्याचा 18 सप्टेंबर हा राखीव दिवस आहे. एसीसीने अशीही माहिती दिली आहे.

एसीसीचं क्रिकेट चाहत्यांना आवाहन

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.