कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना हा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना झाला. गत आशिया किंग श्रीलंकेने बांगलादेशवर 5 विकेट्सने विजय मिळवला. आता तिसरा सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. हा तिसरा सामना संपूर्ण आशिया कप स्पर्धेतील मोठा सामना आहे. हा तिसरा सामना पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया असा होणार आहे. हा सामना शनिवारी 2 सप्टेंबरला कँडी शहरातील पल्लेकले स्टेडियममध्ये पार पडणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ या हायव्होल्टेज सामन्यासाठी सज्ज आहे.दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. दोन्ही संघ या सामन्यात मजबूत प्लेईंग इलेव्हनसोबत मैदानात उतरतील. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या महत्वाच्या साम्यातून प्लेईंग इलेव्हनमधून काही खेळाडूंना डच्चू देऊ शकतो. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणा कुणाला संधी देऊ शकते, हे पाहुयात.
सामना कोणताही असो, सलामी जोडीवर टीमला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी असते. हीच जबाबदारी कॅप्टन रोहित आणि शुबमन गिल या ओपनिंग जोडीवर असणार आहे. पावर प्लेच्या पहिल्या 10 ओव्हरमध्ये जोरदार हिटींग करुन टीमला चांगला स्कोअर करुन देण्याचा प्रयत्न रोहित-शुबमनचा असणार आहे.
केएल राहुल हा दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यातून बाहेर झालेला आहे. विराट कोहली तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या स्थानी खेळू शकतात. ईशान किशनचा टीममध्ये विकेटकीपर म्हणून समावेश केला जाऊ शकतो. ईशान पाचव्या स्थानी खेळू शकतो. तर सूर्यकुमार यादव याला डच्चू मिळू शकतो. ऑलराउंड हार्दिक पंड्या सहाव्या आणि रविंद्र जडेजा सातव्या स्थानी बॅटिंगसाठी उतरतील. या दोघांवर अखेरच्या टप्प्यात जोरदार फटकेबाजी करत फिनीशिंग टच देण्याचा प्रयत्न असेल.
रोहित हार्दिक आणि जडेजा या दोघांव्यतिरिक्त आणखी तिसरा ऑलराउंडरचा समावेश करण्याच्या तयारीत आहे. रोहित कुलदीप यादव याला वगळून अक्षर पटेल याचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करु शकतो. त्यामुळे कुलदीपला पुन्हा बाहेर बसावं लागू शकतं.
वेगवान बॉलिंगची जबाबदारी ही टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या तिघांवर असणार आहे. टीमला सुरुवातीला झटपट विकेट्स देऊन डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्याचं आव्हान या तिघांवर असेल.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाची संभावित प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.