पल्लेकेले | टीम इंडिया अडचणीत असताना उपकर्णधार हार्दिक पंड्या याने जबाबदारी खांद्यावर घेत डाव सावरला. टीम इंडियाची टॉप ऑर्डर पाकिस्तानच्या धारदार बॉलिंगसमोर ढेर झाली. त्यानंतर हार्दिक आणि ईशान या दोघांनी स्कोअरबोर्ड हलता ठेवला. या दोघांनी या दरम्यान संधी मिळेल तेव्हा मोठे फटके मारले. टीम इंडियाला झटपट झटके देणारे पाकिस्तानचे गोलंदाज इशान-पंड्या जोडीसमोर हतबल ठरले. ईशान आणि हार्दिक या दोघांनी टीम इंडियासाठी अर्धशतक ठोकलं.
ईशानने आधी 54 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ईशानने त्यानंतर गिअर बदलला. ईशाननंतर हार्दिक रंगात आला. हार्दिकनेही काही मोठे फटके मारले आणि त्यानेही अर्धशतक पूर्ण केलं. हार्दिकने 62 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. हार्दिकच्या वनडे करियरमधील हे 11 वं अर्धशतक ठरलं.
हार्दिकने अर्धशतकानंतर टॉप गिअर टाकला. हार्दिकने दे दणादण फटकेबाजीला सुरुवात केली. त्यामुळे आता हार्दिक वनडे करियरमधील पहिल्यावहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र हार्दिक दुर्देवी ठरला. हार्दिकचं शतक ठोकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. हार्दिकचा बाजार 87 धावांवर आटोपला. शाहिन आफ्रिदी याने हार्दिकला आघा सलमान याच्या हाती कॅच आऊट केलं.
हार्दिकने 96.67 च्या स्ट्राईक रेटने 90 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 87 धावांची खेळी केली. हार्दिकच्या वनडे करियरमधील ही तिसरी सर्वोच्च खेळी ठरली. हार्दिकचा वनडेत 92 नॉट आऊट हायस्कोअर आहे. त्यानंतर 90 धावा ही पंड्याची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.
हार्दिक पंड्या याचं अर्धशतक
Hardik Pandya joins the party with a fine half-century 🙌🙌
Live – https://t.co/B4XZw382cM… #INDvPAK pic.twitter.com/CDsjyzbAeq
— BCCI (@BCCI) September 2, 2023
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आजम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक,
मोहम्मद रिजवान, इफ्तिखार अहमद, सलमान अगहा, मोहम्मद नवाझ, शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रऊफ.