कोलंबो | क्रिकेट विश्वातून अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप 2023 सुपर 4 मधील पाकिस्तान-टीम इंडिया यांच्यातील आजच्या मुख्य दिवसाचा खेळ हा पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. या सामन्यादरम्यान 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.40 ते 4.50 दरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर तासभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पुढील काही वेळ हा खेळपट्टी सुकवण्यात गेला. या दरम्यान पुन्हा पाऊस आला. पावसाच्या या खेळामुळे आजच्या दिवसात सामना होण्यासाठी आवश्यक तितका पुरेसा वेळ उरला नाही. त्यामुळे नियमानुसार आज खेळ होणार नाही. त्यामुळे आजचा दिवस पावसामुळे वाया गेला आहे. आता या सामन्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
सामन्याच्या मुख्य दिवसावर पावसाने पाणी फेरलं. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी सोमवारी 11 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. राखीव दिवशी हा सामना दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तोवर टीम इंडियाने 2 विकेट्स गमावून 24.1 ओव्हरमध्ये 147 धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि केएल राहुल हे नाबाद खेळत होते.
पावसामुळे पुन्हा सत्यानाश
UPDATE – Play has been called off due to persistent rains 🌧️
See you tomorrow (reserve day) at 3 PM IST!
Scorecard ▶️ https://t.co/kg7Sh2t5pM #TeamIndia | #AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/7thgTaGgYf
— BCCI (@BCCI) September 10, 2023
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होत आहे. सामन्यादरम्यान पाऊस होण्याची शक्यता असल्याने राखीव दिवस ठेवण्यात आला. सामन्यात पावसाची एन्ट्री झाल्यानंतर ग्राउंड स्टाफने मोठ्या चलाखीने झटपट कव्हर टाकले. त्यानंतर तासभर पाऊस पडला. पाऊस थांबल्यानंतर काही भागात पाणी जमा झालेलं. जमलेलं पाणी ग्राउंड स्टाफ सुकवण्याचा प्रयत्न करत होते. पंखे, स्पंज मिळेल ते घेऊन ग्राउंड स्टाफ आटोकाट प्रयत्न करत होते.
तर दुसऱ्या बाजूला अंपायर्सही पंचनामा करत होते. पंचनामा केल्यानंतर पंच हे दोन्ही संघांच्या कर्णधारांकडे गेले. अखेर सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सोमवारी 11 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता सामना सुरु होईल.
दरम्यान त्याआधी पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी दे दणादण फटकेबाजी केली. या दोघांनी 121 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतकं ठोकली. मात्र त्यानंतर दोघेही सलग 2 ओव्हर्समध्ये आऊट झाले. शुबमनने 58 आणि रोहितने 56 धावा केल्या. तर सामना थांबला तोवर केएल आणि विराट या दोघांनी अनुक्रमे नाबाद 17 आणि 8 धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.