कोलंबो | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आशिया कप 2023 साखळी फेरीत सामना पार पडला. मात्र क्रिकेट चाहत्यांना पूर्ण सामन्याचा आनंद घेता आला नाही. पावसामुळे सामना अर्ध्यातच रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात आला. मात्र त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हे कट्टर प्रतिस्पर्धी आशिया कप सुपर 4 मध्ये दोन हात करणार आहेत. हा सामना 10 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याआधी बाबर आझम याने टीम इंडियाला ललकारलं आहे. बाबरने टीम इंडिया विरुद्धच्या सामन्याआधी मोठं विधान केलं आहे.
आम्ही कायमच मोठ्या सामन्यांसाठी सज्ज असतो. आम्ही टीम इंडिया विरुद्धच्या पुढील सामन्यात निश्चित 100 टक्के देऊ”, असं बाबर आझम याने म्हटलं”. बाबर आझम याच्या या विधानावरुन त्यांनी टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी कशाप्रकारे तयारी केली आहे, याचा अंदाज येतो. पाकिस्तानची बॉलिंग साईड ही जगात भारी आहे. त्यांचे वेगवान गोलंदाजच 10 पैकी 10 किंवा किमान 7-8 विकेट्स घेतातच. त्यामुळे टीम इंडियासमोर पाकिस्तानच्या या भेदक माऱ्याचा सामना करण्याचं आव्हान असणार आहे.
दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले जाऊ शकतात. टीममध्ये विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल हा जोडला गेलाय. तो आता खेळण्यासाठी तयार आहे. त्यामुळे ईशान किशन याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातून कलटी दिली जाऊ शकते. तर श्रेयस अय्यर याच्या जागी सूर्यकुमार यादव याला स्थान मिळू शकतं.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
आशिया कप 2023 साठी टीम पाकिस्तान | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.