Asia Cup | Reserve Day ला सामन्याचा निकाल न लागल्यास कोण पोहचणार फायनलमध्ये?

| Updated on: Sep 10, 2023 | 8:08 PM

pakistan vs india asia cup 2023 reserve day | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सुपर 4 सामन्यातही पावसाने पुन्हा खोडा घातलाय. त्यामुळे 3 तासांपेक्षा अधिक वेळ वाया गेला आहे.

Asia Cup | Reserve Day ला सामन्याचा निकाल न लागल्यास कोण पोहचणार फायनलमध्ये?
Follow us on

कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. मात्र त्यानंतर संध्याकाळी पावणे पाच ते पाच दरम्यान पावसाने एन्ट्री घेतली. जवळपास तासभर पाऊस झाला. त्यानंतर पाऊस थांबला. मात्र आता रात्रीचे 8 वाजून गेले आहेत. त्यानंतरही सामना सुरु होण्याची चिन्हं नाहीत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

उभयसंघात साखळी फेरीतील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. हा सामना शनिवार 2 सप्टेंबर रोजी खेळवण्यात आला. हा सामना नाईलाजाने अनेक तासांच्या प्रतिक्षेननंतर रद्द केला गेला. मात्र सुपर 4 मधील या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सप्टेंबर 11 हा दिवस राखीव आहे. मात्र राखीव दिवशीही सामन्याचा निकाल लागला नाही तर काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राखीव दिवसातही सामन्याला निकाल न लागल्यास टीम इंडियाला फायदा होणार की पाकिस्तानला? या सर्वबाबत आपण जाणून घेऊयात.

जाणून घ्या समीकरण

राखीव दिवसातही सामन्याचा निकाल लागला नाही, तर पाकिस्तान आणि टीम इंडिया या दोन्ही संघांना साखळी फेरीनंतर पुन्हा प्रत्येकी 1-1 पॉइंट देण्यात येईल. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी सुपर 4 मधील प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर आता पाकिस्तानला 1 पॉइंट मिळाला तर एकूण 3 पॉइंट्स होतील. तर श्रीलंकेचे 2 आणि टीम इंडियाच्या खात्यात 1 पॉइंट असेल. त्यामुळे टीम इंडियाला बांगलादेश विरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. हा सामना 12 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.