कोलंबो | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसरा सामना पावसामुळे मुख्य दिवशी (10 सप्टेंबर) पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे आता हा सामना राखीव दिवशी (11 सप्टेंबर) पार पडणार आहे. या सामन्याला कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजता सुरुवात व्हायची होती. मात्र पावसामुळे सामन्याला 3 वाजता सुरुवात झालेली नाही. थोडक्यात काय तर राखीव दिवसातही आता पावसाने नाक खुपसलंय. त्यामुळे आता हा सामना रद्द होतो की काय,अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सामन्याच्या मुख्य दिवसात टीम इंडियाच्या डावातील 24.1 ओव्हरपर्यंत खेळ पूर्ण झाला. त्यानंतर मुसळधार पावसामुळे दिवसभर खेळ सुरुच होऊ शकला नाही. त्यामुळे सामना राखीव दिवसात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. राखीव दिवशी दुपारी 3 वाजता सामना सुरु होणार होता. त्याआधी कोलंबोतील हवामान सामन्यसाठी अनुकूल असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आता वेळेत सामना सुरु होण्याची आशा होती. पण पावसामुळे खेळ वेळेत सुरु होऊ शकलेला नाही.
पावसामुळे राखीव दिवसाच्या खेळाला विलंब
Start of the reserve day for the #PAKvIND Super 4 match has been delayed.#AsiaCup2023 | https://t.co/LwHjrkRTlj pic.twitter.com/0mVSwGYfR4
— ICC (@ICC) September 11, 2023
खेळाला आता सुरुवात होईल, काही मिनिटांनी होईल अशा प्रतिक्षेत टीम इंडिया आणि श्रीलंकेचे खेळाडू आहेत. टीम इंडियाचे खेळाडू हे ड्रेसिंग रुमबाहेर येऊन एकमेकांशी गप्पा मारत आहेत. सामन्यादरम्यान पावसामुळे खेळाडूंना वेळ मिळाल्याने ते एकमेकांसोबत बोलत आहेत. दर स्टेडियममधील क्रिकेट चाहते सामना सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान टीम इंडियाने रविवारी खेळ थांबला तोवर 24.1 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 147 धावा केल्या. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि केएल राहुल ही जोडी खेळत आहे. तर रोहित शर्मा 56 आणि शुबमन गिल 58 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहिन अफ्रिदी आणि शादाब खान या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.