PAK vs NED : पाकिस्तानच्या डावात पंचांकडून मोठी चूक, 14 व्या षटकात घडलं असं काही

| Updated on: Oct 06, 2023 | 8:16 PM

World Cup 2023, PAK vs NED : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. या सामन्यात नेदरलँडनं जबरदस्त खेळीचं प्रदर्शन केलं. पण पंचांकडून एक चूक झाली आणि ती म्हणजे...

PAK vs NED : पाकिस्तानच्या डावात पंचांकडून मोठी चूक, 14 व्या षटकात घडलं असं काही
PAK vs NED : 14 व्या षटकात असं कसं झालं, पंचांच्या चुकीचा पाकिस्तानला फटका
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यात नेदरलँडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. पाकिस्तानचे आघाडीचे फलंदाजही झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानवर दडपण दिसून आलं. पाकिस्ताने 49 षटकात सर्व गडी गमवत 286 धावा केल्या आणि विजयसाठी 287 धावांचं आव्हान दिलं. पण असं असलं तरी प्रत्येक चेंडूवर गणित बदलत असतं. एक एक बॉल आणि रन महत्त्वाची ठरते. पण पाकिस्तानचा डाव सुरु असताना नेदरलँडच्या गोलंदाजाने 5 चेंडूचं षटक टाकलं.

नेमकं कसं षटक टाकलं गेलं?

पाकिस्तानचे तीन गडी झटपट बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सउद शकील खेळपट्टीवर तग धरून होते. नेदरलँडचा वेगवान गोलंदाज पॉल वॅन मीकेरेन याने मोहम्मद रिझवान याला तीन निर्धाव चेंडू टाकले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली शकील स्ट्राईकला आला. तेव्हा वॅनने पाचवा आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. त्यावर शकीलने चौकार मारला. पण या नंतर पंच षटक संपल्याचं सांगितलं. एड्रियन होल्डस्टॉक आणि ख्रिस ब्राउन मैदानी पंच आहेत. तर रॉड टकर तिसरा पंच होते. मात्र त्यांनी ही चूक लक्षात आणून दिली नाही.

दोन्ही संघांना पंचांच्या चुकीचा थांगपत्ता लागला नाही. क्रिकेट नियमांनुसार जर पंचांकडून चेंडूची चुकीची मोजणी झाली. तर पंचांनी मोजलेलं षटकच ग्राह्य धरलं जाईल. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महिला टी20 क्रिकेट विश्वचषकातही असंच झालं. भारत पाकिस्तान सामन्यात 7 चेंडूचं षटक टाकलं गेलं होतं. अतिरिक्त चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्सने चौकार मारला होता.

आठव्या षटकानंतरही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. शकीलने वॅन डेर मेरवे याला षटकार ठोकला. त्यानंतर रिझवान लगेचच पंचांकडे गेला आणि सर्कल बाहेर जास्त खेळाडू असल्याचं सांगितलं. आता नेदरलँड पाकिस्तानने आव्हान पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कॅप्टन), इमाम उल हक, फखर जमान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.

नेदरलँडचा संघ: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.