मुल्तान | आशिया कप 2023 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी नेपाळला आपल्या बॅटिंगने झोडून काढलं. बाबर आझम याच्यानंतर इफ्तिखार अहमद याने खणखणीत शतक ठोकलंय. या दोघांच्या शतकामुळे पाकिस्तानला 300 पेक्षा अधिक धावा करता आल्या. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 342 धावा केल्या. कॅप्टन बाबर आझम याने सर्वाधिक 151 धावांची खेळी केली. बाबरने 131 बॉलमध्ये 14 फोर आणि 4 सिक्स ठोकले. बाबरच्या वनडे करियरमधील हे 19 वं शतकं ठरलं.
बाबरनंतर इफ्तिखार अहमद यानेही दे दणादण फटकवायला सुरुवात केली आणि शतक केलं. इफ्तिखार याच्या करिअरमधील पहिलंच शतक ठरलं. इफ्तिखार शेवटपर्यंत नाबाद राहिला. इफ्तिखारने फक्त 71 बॉलमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 153.52 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 109 धावा केल्या. इफ्तिखारच्या वनडे करियरमधील ही सर्वोच्च खेळी ठरली.
बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद या जोडीने पाचव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल 214 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान या दोघांनी वैयक्तिक शतकं ठोकली. विशेष बाब म्हणजे बाबर आणि इफ्तिखार या दोघांनी नेपाळ विरुद्ध केलेली खेळी ही वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली.
बाबर-अहमदचा विक्रम
2️⃣1️⃣4️⃣ runs off 1️⃣3️⃣1️⃣ balls – highest fifth-wicket partnership in ODIs for Pakistan 🥇🤝
How good were these two today❓#PAKvNEP | #AsiaCup2023 pic.twitter.com/sjG4f0weSQ
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 30, 2023
दरम्यान बाबर आणि इफ्तिखार या दोघांव्यतिरिक्त इतर कुणाला विशेष करता आलं नाही. पाकिस्तानची सलामी जोडीने सपशेल निराशा केली. फखर झमान 14 आणि इमाम उल हक 5 धावांवर आऊट झाले. मोहम्मद रिझवान याला चांगली सुरुवात मिळाली, मात्र त्याला त्याचा फायदा घेता आला नाही. आघा सलमान 5 रन्स करुन मैदानाबाहेर गेला. तर शादाब खान याने 4 रन्सचं योगदान दिलं. नेपाळकडून सोमपाल कामी याने 2, तर संदीप लामिछाने आणि करण केसी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.