मुल्तान | पाकिस्तान क्रिकेट टीमने आशिया कप 2023 स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. पाकिस्तानने विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानने नेपाळला 343 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र नेपाळचा बाजार पाकिस्तानच्या भेदक आणि धारधार माऱ्यासमोर 23.4 ओव्हरमध्येच आटोपला. नेपाळने 23.4 ओव्हरमध्ये 104 धावाच करता आल्या. कॅप्टन बाबर आझम, इफ्तिखार अहमद आणि शादाब खान ही तिकडी पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पाकिस्तानची दणक्यात सुरुवात
Asia Cup campaign begins in style! 💪
4️⃣ wickets for @76Shadabkhan as Pakistan achieve their third-highest margin of victory in ODIs ✨#PAKvNEP | #AsiaCup2023 pic.twitter.com/GmTk0tKCbp
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 30, 2023
नेपाळकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. सोमपाल कामी याने सर्वाधिक 28 धावा केल्या. आरिफ शेख 26 धावा करुन माघारी परतला. तर गुलशन झा 13 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर करण केसी 7 धावांवर नाबाद परतला. पाकिस्तानकडून शादाब खान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदी आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर नसीम शाह आणि मोहम्मद नवाझ या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
दरम्यान पाकिस्तानचा वनडे क्रिकेटमधील तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. पाकिस्तानने 18 ऑगस्ट 2016 रोजी आयर्लंड विरुद्ध 255 धावांनी विजय मिळवला होता. तर त्यानंतर 20 जुलै 2018 रोजी पाकिस्तानने झिंब्बावेचा 244 धावांनी खुर्दा उडवला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने नेपाळला 238 धावांनी धुळ चारली आहे. पाकिस्तानचा पुढील सामना हा 2 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध होणार आहे.
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
नेपाळ प्लेईंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने आणि ललित राजबंशी.