मुंबई : आशिया कप 2023 सुरु होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. 30 ऑगस्टला पाकिस्तानच्या मुलतान या क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात आशिया कपमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार आहेत हे जाणून घ्या. पाकिस्तानमधील मुलतान या क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
2018 नंतर तब्बल 5 वर्षांनी वन-डे फॉरमॅटच्या आशिया कपचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत 6 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ आहेत. आशिया कप भारतात होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपच्या पा र्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार आहे. अगदी काही तासांतच आशिया कपच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आशिया कपमध्ये होणारे सामने आपण कोणत्या प्रसार माध्यमांवर लाइव्ह पाहू शकणार आहोत? जाणून घ्या.
आशिया कपमधील पहिला सामना पाकिस्तानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजल्या पासून सुरु होणार आहे. तर आशिया कपमधील होणारे सर्व सामने हे आपल्याला ‘स्टार स्पोर्ट्स नेटवर्क’ यावर लाइव्ह पाहता येणार आहेत. तर सर्व सामन्यांची ऑनलाइन लाइव्ह स्ट्रिमिंग आपल्याला ‘डिजनी प्लस हॉटस्टार’ या अॅपवर पाहता येणार आहे. जिओ सिनेमाच्या मागोमाग आता डिजनी प्लस हॉटस्टारनं सामन्यांची मोफत स्ट्रिमिंग करायला सुरुवात केली आहे. या वेळेस डिजनी प्लस हॉटस्टार वर आशिया कप आणि वन-डे वर्ल्डकप मोफत पाहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींचा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे.