लाहोर | आयपीएल 16 व्या मोसमाचा थरार दररोज पाहायला मिळत आहे. दररोज एकसेएक थरारक आणि हायव्होल्टेज सामने पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात टायटन्स टीमचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याने कोलकाता नाईट रायडर्सच्या शार्दुल ठाकूर याला आऊट करत हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. राशिद खान याची आयपीएलमधील पहिली आणि एकूण चौथी हॅटट्रिक ठरली होती. तसेच राशिदने आयपीएलच्या 16 व्या मोसमात पहिली हॅटट्रिक घेण्याचा बहुमानही मिळवला होता. एकाबाजूला आयपीएलचे सामने रंगत असताना आणखी एका गोलंदाजने हॅटट्रिक घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी याने हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. मॅट याने एकाच सलग 3 चेंडूवर 3 विकेट्स घेतल्या, पण एकाच ओव्हरमध्ये नाही.
मॅट याने पाकिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरच्या 5 व्या आणि 6 व्या बॉलवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद या दोघांना अनु्क्रमे विकेटकीपर टॉम लॅथम याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मॅट 19 वी ओव्हर टाकायला आला. मॅटने 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे 19 वी ओव्हरमधील पहिला बॉल हा मॅटसाठी हॅटट्रिक बॉल होता.
पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी होता. मॅटने टाकेलला बॉल शाहिनने हुशारीने मारला. मात्र बाउंड्री लाईनवर असलेल्या खेळाडूंनी हुशारीने कॅच घेतला आणि शाहिन आफ्रिदी कॅच आऊट झाला.
शाहिनने मारलेला फटका हा बाऊंड्री लाईनच्या बाहेर पडणार इतक्यात तिथे डॅरिल मिचेल याने कॅच पकडला. त्याचा तोल जाऊन बॉलसह बाऊंड्री लाईनला टच होणा इतक्यात त्याने चॅड बोव्स याच्या दिशेने बॉल फेकला. बोव्स यानेही हुशारीने कॅच घेतला. अशा पद्धतीने या दोघांनी रिले टाईप कॅच घेतला. या दोघांच्या हुशारीने मॅटची हॅटट्रिक पूर्ण होऊ शकली. मॅट हॅनरी न्यूझीलंडकडून टी 20 मध्ये हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला.
Shadab Khan ☝️
Iftikhar Ahmed ☝️
Shaheen Afridi ☝️A hat-trick for Matt Henry in the first T20I at the GSL. #PAKvNZ | #CricketMubarak pic.twitter.com/h6bZP6O1hM
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 14, 2023
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), चॅड बोव्स, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, ईश सोधी आणि बेन लिस्टर.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, सैम अयुब, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि जमान खान.