इस्लामाबाद | पाकिस्तान क्रिकेट टीमने न्यूझीलंडला विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने 19.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 182 धावा केल्या. पाकिस्तानकडून फखर झमान आणि सैम अयुब या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. फखर झमान आणि सैम अयुब या दोघांनी प्रत्येकी 47 धावा केल्या. या दोघांशिवाय फहीमन अश्रफ याने 22 धावा केल्या. इमाद वसीम 16 रन्स करुन माघारी परतला. हरीस रौफ याने 11 धावांचं योगदान दिलं. ओपनिंग जोडी मोहम्मद रिजवान आणि कॅप्टन बाबर आझम या दोघांनी अनुक्रमे 8 आणि 9 धावा केल्या. शादाब खान 5 धावांवर आऊट झाला. तर शाहीन अफ्रिदी 1 रन करुन माघारी परतला. इफ्तिकार अहमद याला भोपळाही फोडता आला नाही. तर झमान खान शून्यावर नाबाद राहिला.
फखर आणि सैम या जोडीने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. दुर्देवाने दोघेही 47 धावांवर आऊट झाले. फखर याला इश सोढी याने चॅम्पमॅन याच्या हाती कॅच आऊट झाला. तर सैम रनआऊट झाला. यामुळे दोघांपैकी एकालाही अर्धशतक ठोकता आलं नाही. फखर याने 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 138.24 च्या स्ट्राईक रेटने 47 धावा केल्या. तर सैम याने 28 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 47 रन्सची खेळी केली.
दरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हॅनरी याने हॅटट्रिक घेतली. मॅट याने पाकिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरच्या 5 व्या आणि 6 व्या बॉलवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमद या दोघांना विकेटकीपर टॉम लॅथम याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मॅट 19 वी ओव्हरच्या पहिल्या बॉलवर शाहिन आफ्रिदी याला कॅच आऊट केलं.
न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. एड्म मिल्ने आणि बेन लिस्टर या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजाना आऊट केलं. तर जेम्स निशाम आणि इश सोढी या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाचा काटा काढला.
फखर झमान आणि सैम अयुब जोडीचा धमाका
Pakistan post 182 following scores of 47 each from @SaimAyub7 and @FakharZamanLive ?#PAKvNZ | #CricketMubarak pic.twitter.com/HSK54m6Vdr
— Pakistan Cricket (@TheRealPCB) April 14, 2023
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), चॅड बोव्स, विल यंग, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, रचिन रवींद्र, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, ईश सोधी आणि बेन लिस्टर.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमान, सैम अयुब, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि जमान खान.