कराची | पाकिस्तान क्रिकेट टीमने न्यूझीलंडवर चौथ्या एकदिवसीय सामन्यात 102 धावांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला 335 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानने न्यूझीलंडला 43.4 ओव्हरमध्ये 232 धावावंर ऑलआऊट केलं.
पाकिस्तानने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने एकतर्फी आघाडी घेतली. तसेच पाकिस्तानने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. बाबर आझम आणि उस्मा मीर हे दोघे पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरले. बाबर आझम याने पहिले बॅटिंग करताना 107 धावांची शतकी खेळी केली. तर उस्मा मीर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडकडून कॅप्टन टॉम लॅथम याने सर्वाधिक 60 धावा केल्या. मार्क चॅपमॅन 46 धावा करुन माघारी परतला. डॅरेल मिचले याने 34 धावांचं योगदान दिलं. टॉम ब्लंडेल 23 रन्सवर आऊट झाला. विल यंग याने 15 रन्स जोडल्या. तर जेम्स निशामने 11 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. या व्यतिरिक्त उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. पाकिस्तानकडून उस्मा मीर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद वसिम ज्युनिअर याने 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हरीस रौफ याने 2 विकेट्स घेतल्या. तर शाहिन आफ्रिदी याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 334 धावा केल्या. पाकिस्तानकडून बाबर आझम याचा अपवाद वगळता आघा सलमान याने सर्वाधिक 58 धावा केल्या. मसूद याने 44 रन्सचं योगदान दिलं. इफ्तिखार अहमद याने 28 रन्स केल्या. रिजवान 24 धावा करुन माघारी परतला. शाहिन आफ्रिदी 23 धावांवर नाबाद राहिला. तर मोहम्मद हरीस 17 रन्सवर नॉट आऊट राहिला. तसेच फखर झमान याने 14 रन्सचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून मॅट हॅनरी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर बेन लिस्टर आणि इश सोढी या दोघांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
Congratulations, Pakistan ?
They go to the top of the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings ? pic.twitter.com/GUq2CjOEoK
— ICC (@ICC) May 5, 2023
दरम्यान पाकिस्तान या विजयासह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये एक नंबर टीम ठरली आहे. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तानने ही कामगिरी करुन दाखवली आहे.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, शान मसूद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, मोहम्मद हारिस, आगा सलमान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद वसीम जूनियर.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन | टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, टॉम ब्लंडेल (wk), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, कोल मॅककॉनची, इश सोधी, मॅट हेन्री, ब्लेअर टिकनर आणि बेन लिस्टर.