कोलंबो | आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात गुरुवारी 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडणार आहे. आशिया कप 2023 फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधी पाकिस्तानने आपली प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तानने या आरपारच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये तब्बल 5 बदल केले आहेत.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान 5 बदलांसह मैदानात उतरणार आहे. फखर झमान, सलामान अली आगा, नसीम शाह, हरीस रऊफ, आणि फहीम अश्रफ हे प्लेईंग ईलेव्हनचा भाग नसतील. नसीम शाह याला टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात 10 सप्टेंबरला खांद्याला दुखापत झाली. नसीम शाह या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. नसीम शाह याच्या जागी जमान खान याला संधी देण्यात आली आहे. जमान खान याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश केला गेला आहे. तसेच हरीस रऊफ यालाही दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे.
या अतिशय महत्त्वाच्या सामन्यासाठी टीममध्ये ओपनर मोहम्मद हरीस, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, वेगवान गोलंदाज जमान खान आणि स्पिन ऑलराउंडर मोहम्मद नवाज याचा समावेश करण्यात आला आहे.
पाकिस्तानचे 11 शिलेदार
Our playing XI for the #PAKvSL match 🇵🇰#AsiaCup2023 pic.twitter.com/lhT5Vl8RtX
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 13, 2023
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन |बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.