मुंबई : आशिया कपमधील सुपर 4 च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तावर दणदणीत विजय मिळवला. विराट कोहली आणि केएल राहुलच्या वादळी खेळीने पाकिस्तानच्या गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडलं. भारताने पाकिस्तानला एकतर्फी हरवल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास डाउन झालेला दिसतं आहे. मात्र पाकिस्तानला उद्या श्रीलंका विरुद्ध निर्णायक सामना खेळायचा आहे. हा दोन्ही संघांसाठी सामना करो या मरो असणार आहे.
या सामन्यात जो जिंकेल त्याला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे. पाकिस्तानला श्रीलंकेचं आव्हान पेलणं इतकही सोप असणार नाही. पण या निर्णायक सामन्यामध्ये पावसाचे सावट कायम आहे. जर पाऊस पडला तर काय होणार? कोणाला पावसाचा फायदा होणार ? जाणून घ्या.
आशिया कपच्या सुपर 4 मध्ये टीम इंडियाने पाकिस्तान आणि श्रीलंकेचा पराभव करत फायनलचा पल्ला गाठला आहे. पण आता टीम इंडियासोबत फायनलमध्ये कोण खेळणार हे उद्याच्या सामन्याच्या निकालावर कळणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोघांनीही बांग्लादेशवर मात देवून 1-1 सामना जिंकला आहे. तर दोघांनाही टीम इंडिया समोर हार पत्करावी लागली आहे.
पाकिस्तानला भारताने मोठ्या धावांच्या फरकाने हरवलं असल्याने त्यांचा नेट रनरेट अगदी कमी आहे. तर श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला आहे. दोन्ही टीमचे 2-2 असे समान गुण आहेत. उद्या जो जिंकेल त्याला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे. पण पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि सामना झालाचं नाही तर दोघांनाही समान 1-1 गुण दिला जाईल. श्रीलंकेचा नेट रनरेट पाकिस्तानपेक्षा चांगला असल्या कारणाने श्रीलंकेला आशिया कपच्या फायनलचं तिकिट मिळणार आहे.
दरम्यान, उद्याच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागील आशिया कपमध्येही श्रीलंकेने भारताचा पराभव करत फायनलमध्ये एन्ट्र केली होती. इतकंच नाहीतर फायनलमध्येही श्रालंकेने पाकिस्तान संघाचा पराभव करत आशिया कपवर नाव कोरलं होतं.