PAK vs SL : श्रीलंकन फलंदाजासोबत पाकिस्तानी खेळाडूंची बेईमानी? सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

| Updated on: Oct 10, 2023 | 9:13 PM

World Cup 2023, PAK vs SL : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात वनडे वर्ल्डकपमधील आठवा सामना सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात श्रीलंकेनं पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतलं. दुसरीकडे पाकिस्तानने रडीचा डाव खेळल्याची सोशल मीडियावर रंगली आहे.

PAK vs SL : श्रीलंकन फलंदाजासोबत पाकिस्तानी खेळाडूंची बेईमानी? सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा
PAK vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा रडीचा डाव!बाउंड्रीलाईनवर केलं असं काही
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघही जेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण आशिया कप आणि त्यानंतर सराव सामन्यातील स्थिती पाहता त्यांनी आत्मविश्वास गमावल्याचं दिसत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे खेळाडू स्पर्धेत रडीचा डाव खेळत असल्याचं दिसत आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेदरलँडला पराभूत करत पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पोलखोल झाली असंच म्हणावं लागेल. श्रीलंकन फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली. तसेच 50 षटकात 9 गडी गमवून 344 धावा केल्या आणि विजयासाठी 345 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पाकिस्तान संघ गाठेलही पण त्यांच्या रडीच्या डावाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

नेमकी सोशल मीडियावर काय चर्चा रंगली आहे?

श्रीलंकेकडून कुसल मेंडिस याने 77 चेंडूत 122 धावांची खेळी केली. तसेच सदीरा समरविक्रमा यानेही शतकी खेळी केली. मेंडिसने 65 चेंडूत शतक ठोकलं आणि खेळपट्टीवर तग धरून होता. त्यामुळे त्याच्या आक्रमक खेळीचा पाकिस्तानी गोलंदाजांनी धसका घेतला होता. त्याने 29 व्या षटकात हसन अलीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. डीप मिडविकेटवर झेल बाद झाला. इमाम उल हकने कॅच पकडला खरा पण त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पाकिस्तानने रडीचा डाव खेळल्याचं बोललं जात आहे.

इमाम उल हक याने झेल घतेला तेव्हा बाउंडी लाईन मागे सरकल्याचं दिसत आहे. त्या रस्सीचे वळ स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे बाउंड्री लाईन मागे सरकवल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी रडीचा डाव खेळल्याचं बोललं जात आहे.

असं करणं शक्य आहे का?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात झाला. त्या सामन्यातही असंच चित्र दिसून आलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू जाणीवपूर्वक अशी रणनिती अवलंबत असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत अधिकृत असा कोणताच व्हिडीओ समोर आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांमध्ये नेमकं तथ्य आहे की नाही हे सांगणं कठीण आहे.