कोलंबो | आशिया कप 2023 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील 5 व्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या सामन्याच्या आधीच पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे 2 वाजून 30 मिनिटांनी होणारा टॉस तब्बल 5 वाजता पार पडला आहे. पाकिस्तानने या आरपारच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकणारी टीम आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे.
पावसामुळे तब्बल 2 तास 15 मिनिटांचा खेळ वाया गेला. या सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी होणार होता. तर नियोजित वेळेनुसार सामना 3 वाजता सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या अवकृपेमुळे वेळेत टॉस होऊ शकला नाही. जवळपास तासभरानंतर पाऊस थांबला. त्यानंतर ग्राउंड स्टाफने कव्हर्सवरील पाणी हटवलं. खेळपट्टी खेळण्याच्या पात्रतेची केली. पंचांनी पाहणी केली. त्यानंतर टॉस संध्याकाळी 5 वाजता उडवण्यात आला. तर 15 मिनिटांनी खेळाला सुरुवात होईल. पाऊस आणि खेळपट्टी ओली झाल्याने सामना आता 50 ऐवजी 45 ओव्हरचा होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील किमान 5 गोलंदाजांना जास्तीत जास्त 9 ओव्हर टाकता येणार आहेत.
पाकिस्तानने टॉस जिंकला
🚨 T O S S A L E R T 🚨
Pakistan win the toss and elect to bat first. The match has been reduced to 45 overs per side 🏏#PAKvSL | #AsiaCup2023 pic.twitter.com/dvinfuBN0F
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 14, 2023
पाकिस्तान आणि श्रींलका दोन्ही संघांनी या ‘करो या मरो’ सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. पाकिस्तानने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी 13 सप्टेंबरलाच प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली होती. मात्र ऐनवेळेस सामन्याआधी आणखी काही बदल करण्यात आले आहेत. इमाम उल हक याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या जागी फखर जमान याला संधी दिली गेली आहे. तर सऊद शकील याची प्रकृती बिघडल्याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये अब्दुल्लाह शफीक याचा समावेश करण्यात आला आहे.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद हरिस, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह अफ्रीदी आणि जमान खान.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन आणि मथीशा पाथिराना.