Test Cricket : 2 सामने आणि 15 खेळाडू, कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाची एन्ट्री?

| Updated on: Jan 11, 2025 | 7:05 PM

Test Cricket : निवड समितीने मायदेशात होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. जाणून घ्या संघात कुणला संधी मिळालीय?

Test Cricket : 2 सामने आणि 15 खेळाडू, कसोटी मालिकेसाठी टीम जाहीर, कुणाची एन्ट्री?
season ball
Follow us on

पाकिस्तान क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोन्ही कसोटी सामने गमवावे लागले. दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना 2 विकेट्सने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली. पाकिस्तानला त्यानंतर दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्यासह पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दुसऱ्या सामन्यातही धुव्वा उडवला. त्यानंतर आता पाकिस्तान मायदेशात विंडीजविरुद्ध 2 सामन्यांचीच कसोटी मालिका खेळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या मालिकसेाठी एकूण 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

उभयसंघांतील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा 17 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने हे मुलतानमध्येच खेळवण्यात येणार आहेत. पाकिस्तानने विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधील तब्बल 7 खेळाडूंना डच्चू दिला आहे. निवड समितीने आमिर जमाल, मोहम्मद अब्बास, मीर हामजा आणि नसीम शाह यांना विश्रांती दिली आहे. तर सॅम अयूब याला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहेत. तर विकेटकीपर हसीबुल्लाह याला डच्चू देण्यात आला आहे.

तर कॅप्टन शान मसूद उपकर्णधार सऊद शकील, बाबर आझम, कामरान गुलमा, खुर्रम शहजाद, मोहम्मद रिझवान, नोमान अली आणि सलामान अली आघा यांचा संघात समावेश आहे. हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात होते. तसेच ओपनर इमामू उल हक याचं कमबॅक झालं आहे. इमाम उल हक याने अखेरचा सामना हा डिसेंबर 2023 साली खेळला होता. तसेच साजिद खान आणि अबरार अहमद यांनाही स्थान देण्यात आलं आहे.

17 जानेवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज, 17 ते 21 जानेवारी, पहिला कसोटी सामना, मुल्तान.

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज, 25 ते 29 जानेवारी, दुसरा कसोटी, मुल्तान.

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : शान मसूद (कर्णधार), सऊद शकील (उपकर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, इमाम-उल-हक, कामरान गुलाम, काशिफ अली, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नोमान अली, रोहेल नज़ीर (विकेटकीपर), साजिद खान आणि सलमान अली आगा.