इस्लामाबाद | क्रिकेट टीम इंडिया जुलै महिन्यात विंडिज दौऱ्यावर जामार आहे.या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. पहिला कसोटी सामना हा 12 ते 16 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. तर दुसरी टेस्ट मॅच ही 20-24 जुलै रोजी पार पडणार आहे. या दरम्यान जुलैमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी टीम जाहीर करण्यात आली आहे. टीममध्ये 21 वर्षीय युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. तर स्टार गोलंदाजाचं कमबॅक झालं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.या दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर मोहम्मद रिजवान याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच 1 वर्षापासून दुखापतीमुळे टीममधून बाहेर असलेला स्टार बॉलर शाहीन शाह आफ्रिदी याचं कमबॅक झालंय.
पीसीबीने श्रीलंका विरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी 21 वर्षीय युवा फलंदा मोहम्मद हुरैरा याला संधी दिली आहे. हुरेरा याने आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये 2 हजार 252 धावा केल्या आहेत. तसेच 8 शतकंही ठोकली आहेत.
Shaheen Afridi returns to Test side for Sri Lanka tour
Read more: https://t.co/M5Mzljpb5I#SLvPAK
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 17, 2023
बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर/उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हुरेरा, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नोमान अली, सलमान अली आगा , सरफराज अहमद (विकेटकीपर), सऊद शकील, शाहीन अफरीदी आणि शान मसूद.
पहिला कसोटी सामना, 12-16 जुलै
दुसरा कसोटी सामना, 20-24 जुलै
दरम्यान पाकिस्तान गेल्या वर्षी अर्थात 2022 मध्येही श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. तेव्हा उभयसंघात 1 सराव सामना आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. सराव सामना हा 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान पार पडला होता. हा सराव सामना अनिर्णित राहिला होता.
तर त्यांतर 16 जुलैपासून 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली. या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर 246 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. अशा प्रकारे ही 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती. त्यामुळे यावेळेस कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.