ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीमची घोषणा, या खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी

| Updated on: Nov 20, 2023 | 6:05 PM

Cricket News | 13 व्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विश्व विजेता होण्यापासून एक पाऊल दूर राहिली. तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. या वर्ल्ड कपनंतर आता अनेक मालिका खेळवण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरिजसाठी टीमची घोषणा, या खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ची सांगता झाली आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियाला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला. ऑस्ट्रेलियाची ही वर्ल्ड कप जिंकण्याची सहावी वेळ ठरली. तर टीम इंडियाचं पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न हे अधुरं राहिलं. आता या वर्ल्ड कपनंतर पुन्हा एकदा द्विपक्षीय आणि इतर मालिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 4 सामन्यांची ही मालिका असणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी केव्हाच संघाची घोषणा केली आहे. तर बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाची अजूनही घोषणा केलेली नाही. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्थात पीसीबीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान टीम नव्या कॅप्टनसह ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. पाकिस्तानचा हा ऑस्ट्रेलिया दौरा कसा असेल आणि नवा कॅप्टन कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

पीसीबीने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. शान मसूद हा या मालिकेत पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. बाबर आझम याने पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता शान मसूद याला जबाबदारी मिळाली आहे. डिसेंबर 2023- ते जानेवारी 2024 दरम्यान ही कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

पाकिस्तान टीमची घोषणा

ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 ते 18 डिसेंबर, पर्थ.

दुसरा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न.

तिसरा सामना, 3 ते 7 जानेवारी, सिडनी.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम | शान मसूद (कर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, हसन अली, इमाम-उल-हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, नोमान अली , सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर), सौद शकील आणि शाहीन शाह आफ्रिदी.