बांगलादेशने पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत पराभूत करुन इतिहास रचला. बांगलादेशने पाकिस्तानला 2 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता पाकिस्तान मायदेशात पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. इंग्लंड ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान दौऱ्यावर येत आहे. इंग्लंड या दौऱ्यात पाकिस्तान विरुद्ध 7 ते 28 ऑक्टोबर दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
शान मसूद याचं कर्णधारपद कायम आहे. बांगलादेशने पराभूत केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कर्णधार बदलणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र तसं झालं नाही. शान मसूद याच्याकडेच नेतृत्वाची सूत्रं आहेत. तर सौद शकीलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तसेच संघात 1 वर्षाने डावखुऱ्या स्पिनरची एन्ट्री झाली आहे. नोमान अली याला संधी दिली गेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.
नोमान अली या 37 वर्षीय स्पिनरला वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद याच्या जागी संधी दिली गेली आहे. खुर्रम शहजाद याला दुखापतीमुळे संधी मिळाली नाही. नोमान अखेरचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता. नोमानने अखेरच्या कसोटी सामन्यात श्रीलंके विरुद्ध कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत 70 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर नोमानला कमबॅकसाठी वर्षभर वाट पाहावी लागली.
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ जाहीर
Pakistan have named a strong squad for the first Test against England 👀#WTC25 | #PAKvENGhttps://t.co/u1FofEO7QL
— ICC (@ICC) September 24, 2024
पहिला सामना, 7 ते 11 ऑक्टोबर, मुल्तान
दुसरा सामना, 15 ते 19 ऑक्टोबर, मुल्तान
तिसरा सामना, 24 ते 28 ऑक्टोबर, रावळपिंडी
पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तान क्रिकेट टीम : शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, मीर हमजा, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, नोमान अली, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी.