पाकिस्तानचा फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. बाबरला एकएक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. बाबरला बांगलादेश विरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटीत मालिकेतही काही खास करता आलं नाही. बाबरने 2 कसोटींमधील 4 डावांमध्ये एकूण 64 धावा केल्या. तर बाबरची या मालिकेतील एका डावातील 31 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. तसेच बाबर मायदेशातील या मालिकेत पहिल्यांदाच झिरोवर आऊट झाला. त्यामुळे बाबरवर सडकून टीका केली जात आहे. अशातच आता बाबरला आयसीसीने मोठा झटका दिला आह. आयसीसी कसोटी क्रमवारी जारी केली आहे. बाबर आझम या क्रमवारीतील पहिल्या 10 मधून बाहेर फेकला गेला आहे.
बाबर आझम बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेआधी फलंदाजांच्या क्रमवारीत नवव्या स्थानी होता. मात्र या मालिकेतील कामगिरीमुळे त्याला 3 स्थानांचं नुकसान झालं आहे. बाबर आझम आता 12 व्या स्थानी फेकला गेला आहे. बाबरच्या खात्यात 712 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर नवव्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजा याने झेप घेतली आहे. उस्मानला एका स्थानाने फायदा झाला. उस्मानकडे 728 रेटिंग पॉइंट्स आहेत. तर पाकिस्तानचा मोहम्मज रिझवान दहाव्या स्थानी आहे. रिझवानने बांगलागदेश विरुद्ध पहिल्या कसोटीत नाबाद 171 धावांची खेळी केली होती. त्याचा फायदा रिझवानला झाला आहे.
बाबरला गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बाबरने अखेरीस 26 डिसेंबर 2022 रोजी न्यूझीलंड विरुद्ध 161 धावांची खेळी केली. त्यानंतर बाबरचा उतरता काळ सुरु झाला. बाबरला तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 618 दिवसांमध्ये एक अर्धशतकही झळकावता आलेलं नाही.
Joe Root’s ascendancy at the top of ICC Men’s Test Batter Rankings continues 🔥#ICCRankings details ⬇️https://t.co/i6kYud5Qi5
— ICC (@ICC) September 4, 2024
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुट याने श्रीलंके विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 34 वं शतक ठरलं. रुट यासह एलिस्टर कूकला मागे टाकत इंग्लंडसाठी सर्वाधिक शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रुट 922 पॉइंट्ससह अव्वल स्थानी कायम आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा केन विलियमसन दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित सहाव्या तर यशस्वी जयस्वाल सातव्या स्थानी आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानी कायम आहे.