India Vs Pakistan : “भूतकाळ हा भूतकाळ असतो, आता आम्ही…”, बाबर आझम याचं टीम इंडियाला आव्हान

| Updated on: Oct 13, 2023 | 5:59 PM

India Vs Pakistan : भारत पाकिस्तान सामन्याची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज असून अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बाबर आझम याने टीम इंडियाला डिवचलं.

India Vs Pakistan : भूतकाळ हा भूतकाळ असतो, आता आम्ही..., बाबर आझम याचं टीम इंडियाला आव्हान
India Vs Pakistan : "आम्ही सुरुवातीचे दोन सामने जिंकलो आहोत आणि...", बाबर आझम याने टीम इंडियाला डिवचलं
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील हायव्होल्टेज भारत आणि पाकिस्तान सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासात पाकिस्तानचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. भारताविरुद्ध एकदाही जिंकता आलेलं नाही. दुसरीकडे, टीम इंडियामध्ये शुबमन गिल कमबॅक करेल असं सांगितलं जात आहे. त्यात या सामन्यापूर्वीच दोन्ही संघांचे चाहते सोशल मीडियावर भिडले आहेत. आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याची भर पडली आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने टीम इंडियाला डिवचलं. तसेच नाणेफेकीचा कौल या सामन्यात महत्त्वाचा ठरणार असल्याचं सांगितलं.

काय म्हणाला बाबर आझम?

“भूतकाळ हा भूतकाळ असतो आम्ही आता वर्तमानाकडे पाहात आहोत. रेकॉर्ड मोडण्यासाठीच तयार होतात. मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही या स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकलो आहोत. आशा आहे की विजयी रथ यापुढेही कायम राहील.यापूर्वीही आम्ही भारताला पराभूत केलं आहे. पुन्हा असं करू शकतो.”, असं सांगत बाबर आझम याने एकप्रकारे टीम इंडियाला डिवचलं आहे.

बाबर आझम याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा असल्याचं सांगितलं आहे. “दव भारत पाकिस्तान सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. आतापर्यंत झालेल्या सर्व सामन्यात टॉस महत्त्वाचा ठरला आहे. काल रात्रीही अहमदाबादमध्ये दव पडलं होतं. आम्ही पंचांना दव पडलं तर आउटफील्डवर स्प्रे करणार की नाही याबाबत विचारणार आहोत. ”

फक्त या सामन्यासाठी नाही दिलं कर्णधारपद

भारताने पराभूत केलं तर कर्णधारपद जाईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बाबर आझमने उत्तर देत म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कर्णधारपद हे भारताविरुद्धच्या सामन्यात जय पराजयावर अवलंबून आहे. मला फक्त या सामन्यासाठी कर्णधारपद दिलेलं नाही.’ बाबर आझम पहिल्या दोन सामन्यात पूर्णपणे फेल ठरला आहे. दोन सामन्यात त्याने 15 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीप), सउद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रउफ.

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन/शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज