पाकिस्तान चॅम्पियन टीमने यूनिस खान याच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लेजेंड्स 2024 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तानने वेस्ट इंडिज चॅम्पियनवर 20 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने विंडिजला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. विंडिजची या धावांचा पाठलाग करताना हवी तशी सुरुवात झाली नाही. त्यानंतर विंडिजच्या काही फलंदाजांना आश्वासक सुरुवात मिळूनही त्यांना टीमला विजय मिळवून देण्यात यशं आलं नाही. पाकिस्तानने विंडिजला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. विंडिजचं यासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तर पाकिस्तान या स्पर्धेत फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली. आता दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंडिया-ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. यातील विजयी संघ पाकिस्तान विरुद्ध ट्रॉफीसाठी भिडणार आहे.
पाकिस्तानच्या विजयानंतर प्रेझेंटेटरने कॅप्टन यूनिस खान यान याला फायनलमध्ये इंडिया की ऑस्ट्रेलिया, कुणा विरुद्ध खेळायला आवडेल? असा प्रश्न केला. यावर कॅप्टन यूनिसने प्रतिक्रिया दिली. “दोन्ही टीम टॉपच्या आहेत. त्या दोन्ही टीममध्ये मॅचविनर खेळाडू आहेत. जे चांगल्याप्रकारे परिस्थिती हाताळतील ते जिंकतील”, असं यूनिस खान म्हणाला.
दरम्यान यूनिसने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या पाकिस्तानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 198 धावा केल्या. एकट्या यूनिसचं या 198 मध्ये 65 धावांचं योगदान होतं. यूनिसने 45 बॉलमध्ये 6 चौकार आणि 1 षटाकारंच्याम मदतीने ही खेळी केली.
यूनिस खान विजयानंतर काय म्हणाला?
Pakistan Champions vs West Indies Champions 1st Semi Final
younis khan post match presentation.|#WCL2024 | #PAKvsWI #WIvsPAK | #Pakistan | #YounisKhan | #AmirYamin | #SohailTanvir | #PakistanChampions | pic.twitter.com/4t2t3idLtl
— Sanjay Patil (@patil23697) July 12, 2024
वेस्ट इंडिज चॅम्पियन्स प्लेइंग इलेव्हन: डॅरेन सॅमी (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, चॅडविक वॉल्टन (विकेटकीपर), जोनाथन कार्टर, जेसन मोहम्मद, ॲशले नर्स, रायड एम्रिट, जेरोम टेलर, फिडेल एडवर्ड्स, टिनो बेस्ट आणि सुलेमान बेन.
पाकिस्तान चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युनूस खान (कॅप्टन), कामरान अकमल (विकेटकीपर), शर्जील खान, सोहेब मकसूद, शाहिद आफ्रिदी, शोएब मलिक, मिसबाह-उल-हक, आमेर यामीन, सोहेल खान, वहाब रियाझ आणि सोहेल तन्वीर.