मुंबई : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदासाठी नव्या दमाच्या खेळाडूकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तानी संघ अफगाणिस्तान दौऱ्यावर जाणार आहे, त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसोबत शाहीन शाह आफ्रिदी यांचं नाव नाही. तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतून पाकिस्तानने कर्णधार बाबर आझम आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीसह वरिष्ठ क्रिकेटपटूंना विश्रांती दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख नजम सेठी यांनी मात्र बाबरच पाकिस्तान संघाचा कर्णधार राहणार असल्याचं सांगितलं आहे. वेगवान गोलंदाज इहसानुल्लाह, जमान खान, फलंदाज तय्यब ताहिर आणि सैम अयुब या चार नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय आझम खान, फहीम अश्रफ आणि इमाद वसीम यांनी संघात पुनरागमन केले आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना 25 मार्च रोजी खेळवला जाणार आहे, तर दुसरा सामना 27 मार्च रोजी होणार आहे. मालिकेतील शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 29 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. तिन्ही सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत.
वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यामागील कारणे सांगताना मुख्य निवडकर्ता हारून रशीद म्हणाले की, मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन मानक रोटेशन धोरणाचे पालन केलं आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स येथे होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी एक मजबूत संघ तयार करत आहोत.
Shadab to captain Pakistan against Afghanistan in Sharjah
Read more: https://t.co/257t4GD0VG#AFGvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/yUJQQ27tqT
— PCB Media (@TheRealPCBMedia) March 13, 2023
शादाब खान (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, सईम अयुब, शान मसूद , तय्यब ताहिर, जमान खान,
राखीव खेळाडू: अबरार अहमद, हसिबुल्लाह आणि उसामा मीर