मुंबई | आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. तर 14 ऑक्टोबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्याआधीपासून आता वातावरणनिर्मिती झाली आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानच्या खेळाडूने टीम इंडियाला इशारा देण्याचा मुर्खपणा केला आहे.
पाकिस्तानचा युवा खेळाडू अब्दुल्लाह शफीक याने टीम इंडियाला इशारा दिला आहे. “मी टीम इंडिया विरुद्धच्या वर् ल्डकपमधील सामन्यासाठी उत्साही आहे. हा सामना माझ्यासाठी इतर सामन्यांप्रमाणेच असेल. तसेच कर्णधार बाबर आझम हा क्रिकेट विश्वातील एक सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक आहे”, असं शफीक म्हणाला.
बाबरने काही महिन्यांपूर्वी अब्दुल्लाह शफीकच्या खेळाची स्तुती केली होती. बाबरने केलेल्या कौतुकाबाबत शफीकने प्रतिक्रिया दिलीय. “एवढा महान खेळाडू माझी स्तुती करतो ही माझ्यासाठी खुप सुखद बाब आहे”, अशा शब्दात शफीकने प्रतिक्रिया दिली. तसेच टीम इंडियावर टीका करण्याचा प्रयत्न केला.
‘We are excited for the rivalry against India, but it’s just another match for us. Babar bhai is one of the best players in the world, it feels great when he praises you. Our pace attack is best in the world too and we can chase 300 runs’ – Abdullah Shafique #AsiaCup2023 #CWC23 pic.twitter.com/RrA5lV3kxh
— Farid Khan (@_FaridKhan) August 15, 2023
“पाकिस्तानकडे सद्यस्थितीत क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत.आमच्याकडे असा गोलंदाजांचा ताफा आहे, जो अनेकांना चित करु शकतो. सोबतच पाकिस्तानची बॅटिंगही वनडेमध्ये 300 पेक्षा जास्त धावा बनवण्यास आणि 300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्यासाठी सक्षम आहे.” असे म्हणत शफीकने टीम इंडियाला इशारा दिला आहे.
टीम इंडिया-पाकिस्तान वर्ल्ड कपआधी एशिया कपमध्ये आमनेसामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. तर त्यानंतर 2 वेळा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. एशिया कपमध्ये बाबर आझम पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळणार आहे