पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज बाबर आझम याचा सध्या पडता काळ सुरु आहे. बाबर कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरतोय. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या 2 सामन्यांच्या मालिकेतील 4 डावातही बाबर आपयशी ठरलाय. बाबरला एका डावाच सुरुवात मिळाली. मात्र बाबरला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. थोडक्यात काय तर बाबरला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बाबरकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असते. मात्र त्याला चाहत्यांना अपेक्षित खेळी करता येत नाहीय. त्यामुळे नेटकऱ्यांनी बाबरला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलंय.
बाबर सातत्याने अपयशी ठरतोय. त्यामुळे बाबरची खिल्ली उडवली जातेय. इतकंच नाही, तर बाबरला निवृत्तीचा सल्ला दिला जातोय. नेटकऱ्यांनी बाबर आझमवरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही सुनावलंय. अशात सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होतेय. व्हायरल पोस्टमध्ये बाबर आझम कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. बाबर आझम या नावाने एक्सवर (ट्विटर) “2 वर्षांच्या संघर्षानंतर मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. मी माझ्या सहकाऱ्यांचा, चाहत्यांचा आणि प्रशिक्षकांचा आभारी आहे”, असं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलंय.
“हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, कारण क्रिकेट माझं पॅशन आहे. क्रिकेटमध्ये वेगळ्या पद्धतीने योगदान देण्याची ही वेळ आहे. मी माझ्या क्षमेतसह क्रिकेटमध्ये योगदान देत राहेन. सर्वांना धन्यवाद”,असंही या बाबर आझमच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटलंय. मात्र हे साफ खोटं आहे. बाबरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. हा खोडसाळपणा आहे. काही अतिउत्साही नेटकऱ्यांनी बाबर आझमच्या निवृत्तीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. मात्र बाबरच्या निवृत्तीच्या या सर्व पोस्ट साफ चुकीच्या आहेत.
कसोटी क्रिकेटला बाबरचा बायबाय?
Bye bye test cricket👋 pic.twitter.com/5v5kDKgqs6
— Babar Azam – Parody (@babarazam228) September 2, 2024
बाबरच्या निवृत्तीचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट
— Babar Azam 🧢 (@babaarazam258) September 2, 2024
दरम्यान पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलंय. बांगलादेशने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 42 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता बांगलादेशला पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी आणखी 143 धावांची गरज आहे.