कोलंबो | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचा माहोल सर्वत्र पाहायला मिळतोय. त्याआधी बहुतेक टीम या वनडे सीरिजद्वारे वर्ल्ड कपची जोरदार तयारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला टीम इंडियाने मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा 41 धावांनी धुव्वा उडवत आशिया कप 2023 फायनलमध्ये एन्ट्री मारली. त्यानंतर आता 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आमनासामना होणार आहे. दोन्ही संघासाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. या सामन्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे.
टीमचा स्टार मॅचविनर बॉलर हा वर्ल्ड कपआधी दुखापतीच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे टीमचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह हा दुखापतीमुळे आशिया कप 2023 स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. नसीम शाह बाहेर झाल्याने पाकिस्तानसाठी हा मोठा झटका आहे. तर टीममध्ये नसीमच्य जागी झमान खान या युवा गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.
नसीम शाह आऊट
Pakistan provide latest medical update on injuries to Naseem Shah and Haris Rauf heading into #CWC23 👀
Read on 👇
— ICC (@ICC) September 13, 2023
नसीम शाह याला टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग दरम्यान उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. नसीम 49 व्या ओव्हरनंतर मैदानाबाहेर गेला होता. या दुखापतीमुळे नसीम बॅटिंगलाही येऊ शकला नाही. नसीमला दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्ध पूर्ण 10 ओव्हरही टाकता आल्या नाहीत. नसीमने 9.2 ओव्हरमध्ये 53 धावा दिल्या.
दरम्यान पाकिस्तानचा आणखी एक स्टार बॉलर हरीस रऊफ हा देखील दुखापतीतून पू्र्णपणे सावरलेला नाही. रउफला या दुखापतीमुळे राखीव दिवशी बॉलिंग करता आली नव्हती.तुर्तास तरी हरीस आशिया कपमधून बाहेर पडलेला नाही. पाकिस्तान मेडीकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाझ, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, जमान खान आणि शाहीन आफ्रिदी.