मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहावा टप्प्यातील शेवटचा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. म्हणजेच प्रत्येक संघाचे प्रत्येकी सहा सामने झाले आहेत. पाकिस्तान बांगलादेश सामन्यापासून सातव्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात उपांत्य फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे. कारण भारत सोडलं तर सात संघांची उपांत्य फेरीसाठी चुरस आहे. त्यामुळे एक पराभव स्वप्न धुळीस मिळवू शकतं. पाकिस्तान आणि बांगलादेश सामना असाच निकाल देणारा ठरणार आहे. कारण बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. पण पाकिस्तानची उपांत्य फेरीची वाट अडवू शकतो. पाकिस्तान 4 गुण आणि -0.387 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे. तर साखळी फेरीत अजूनही 3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर 6 गुण मिळतील आणि एकूण 10 गुण होतील. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका सोडलं तर एकाही संघाचे 10 गुण नाहीत. त्यामुळे उपांत्य फेरीची शक्यत आहे.
गुणतालिकेत भारताचे 12 गुण असून उपांत्य फेरीचं गणित सुटलं आहे. उर्वरित तीन सामने गमावले तरी भारत चौथ्या स्थानावर राहील. कारण पाचव्या स्थानापासून स्थानापासून पुढे असलेल्या संघांना 12 गुण मिळवणं कठीण आहे. जरी मिळवले तरी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचं कठीण होईल. त्यामुळे भारताला तसा धक्का पोहोचणार नाही. भारताचे उर्वरित तीन सामने श्रीलंका, दक्षिण अफ्रिका आणि नेदरलँड या संघांशी आहेत.
दुसरीकडे, पाकिस्तानचे उर्वरित तीन सामने बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडशी आहे. त्यामुळे एक पराभव उपांत्य फेरीचं गणित खराब करू शकतं. त्यामुळे तिन्ही सामन्यात विजय मिळवून नेट रनरेट चांगला ठेवणं गरजेचं आहे. पाकिस्तानने स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकले.मात्र त्यानंतर सलग 4 सामने गमवल्याने उपांत्य फेरीचं गणित जर तर वर अवलंबून आहे.
पाकिस्तान बांगलादेशला सहज पराभूत करेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं तर गुणतालिकेत जबरदस्त चुरस निर्माण होईल. त्यामुळे श्रीलंका अफगाणिस्तान या संघांना संधी मिळू शकते. म्हणजेच सातव्या टप्प्यात उपांत्य फेरीची लढाई जर तर वर आली आहे असंच म्हणावं लागेल.