World Cup 2023 सुरू असताना दिग्गज खेळाडूवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

| Updated on: Oct 17, 2023 | 1:38 PM

World Cup 2023 : वर्ल्ड कप सूरू असताना एका दिग्गज खेळाडूवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याची बातमी त्या खेळाडूने ट्विट करत दिली आहे.

World Cup 2023 सुरू असताना दिग्गज खेळाडूवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून आता दहा सामने झाले असून चॅम्पियन ऑस्ट्रिलिया संघाने आता कुठे पहिला विजय मिळवला आहे. वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अफगाणिस्तान संघाने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाचा पराभव केलाय. तर भारत आणि न्यूझीलंड संघाने सुरूवातीचे तिन्ही सामने खिशात घातले आहेत. अशातच एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज खेळाडूच्या बहिणीचं निधन झालं आहे.

 

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिन आफ्रिदी याच्या बहिणीचं निधन झालं आहे. आफ्रिदीन सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली होती. शाहिद आफ्रिदी याची बहिण गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. रूग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी संध्याकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.

शाहिद आफ्रिदी याने एक दिवस आधी म्हणजेच १६ ऑक्टोबरला आपली बहिण आजारी असल्याची माहिती सर्वांना दिली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी बहिणीच्या निधनाबाबतही त्याने ट्विट करत सांगितलं.

दरम्यान, शाहिद आफ्रिदीला दहा भावंडे असून 6 भाऊ आणि 5 बहिणी असा त्यांचा परिवार आहे. आफ्रिदी त्यामधील पाच नंबरचा असून त्याच्या भावंडांमधील तारिक आफ्रिदी आणि अश्फाक आफ्रिदी यांनी क्रिकेटमध्ये प्रयत्न केला होता. मात्र शाहिद सर्वात जास्त यशस्वी ठरला. शाहिर आफ्रिदी याला एकूण पाच मुलं असून त्याच्या एका मुलीचं पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी याच्यासोबत विवाह करून दिला होता.